" बापटसाहेब तुम्ही गेल्यावर माझं कसं होईल !" - जयंत पाटील

girish-bapat-jayant-patil-
girish-bapat-jayant-patil-

मुंबई  : विधानसभेत कर्जमाफीच्या प्रस्तावावर  चर्चा सुरु असतांना जयंत पाटील भाषण करीत होते . तेंव्हा  विधानसभेमधून  संसदिय कार्यमंत्री गिरीश बापट सभागृहातून  बाहेरनिघू लागले .  ते पाहून जयंत पाटील म्हणाले, ''बापटसाहेब तुम्ही गेल्यावर माझं कसं होईल "?

  त्यावर जाताजाताच  ''खोटं बोलणं ऐकवत नाही',' असा खोचक टोमणा गिरीश बापट यांनी मारला. 

त्यावर '' सत्ताधिन  झालं की मनाविरुद्ध  बोलणं ऐकवत नसते ',' असा प्रतीटोला जयंत पाटील यांनी लगावला.

सत्ताधारी पक्षाकडून नियम २९३ अन्वये उपस्थित कर्जमाफीच्या प्रस्तावावरील चर्चेत बोलताना आमदार जयंत पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. 

जयंत पाटील म्हणाले, " भाजपच्या नेत्यांची वक्तव्य बघा काय आहेत. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष तर शेतकऱ्यांना काय म्हणाले ते तर माहितच आहे. व्यंकय्या नायडू म्हणाले होते, कर्जमाफीची मागणी ही फँशन आहे. बरं झालं ते उपराष्ट्रपती होण्याअगोदर तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला"  असा चिमटा पाटील यांनी भाजपला काढला. 

त्यावर जागेवर बसून बोलणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांना उद्देशून जयंत पाटील म्हणाले, "अतुलजी तुमच्याबरोबर माधव भंडारी आहेत . ते  तुमच्या सारखे टिव्हीचे आर्टीस्ट आहेत. ते म्हणत आहेत, आम्ही शेतीमाल आयात करू . आता तुम्ही सांगा ! "  

   "आपलं सरकारी वेब पोर्टल  उघडतं नव्हतं. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे  फार्म डाऊनलोड करताना नाकी नऊ येतात .   आँन लाईन बाकीचे उद्योग करा. हे उद्योग कशाला ? "असा प्रश्नही जयंत पाटील यांनी विचारला.

जयंत पाटील म्हणाले," मला शेतकऱ्यांचे  दु:ख  बघवत नाही. बाजारात बापाच्या मालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांनी आत्महत्या सुरू केल्या.

त्यानंतर आम्ही सभागृहात  माणूसकीने कर्जमाफी करण्याची मागणी केली. अमेरिकेमध्ये 20 मिलीयन डाँलर तर युरोपमध्ये 360 मिलीयन डाँलर अनुदान दिलं जातं त्यामुळे आपण शेतकऱ्यांना जास्त देतोय असं समजू नका " . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com