मनोहरपंत म्हणे देणार लोकशाहीचे धडे

मनोहरपंत म्हणे देणार  लोकशाहीचे धडे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत विविध विषयांवर पक्ष नेत्यांचा अभ्यास घेतला जात आहे. मुंबईत होणाऱ्या तीन दिवसांच्या बैठकीत पक्षाच्या मोर्चेबांधणीची तयारी कशी असावी यावर शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या नेते व कार्यकर्त्यांना धडे दिले जात आहेत. आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी शिवसेनेच्या नेत्यांना लोकशाहीचे धडे देणार आहेत. 

नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक तोंडावर आली असून त्याची रणनीती संदर्भात चर्चा होणार आहे. आज दुपारी(ता.3) वांद्रे येथील रंगशारदा येथे शिवसेनेच्या जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्यांकरीता प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. शिबिराचे उद्‌घाटन शिवसेनेचे जोशी व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होईल. 

शिबिराच्या पहिल्या सत्रात सुत्रसंचालनाची जबाबदारी शिवसेना सचिव विनायक राऊत पार पाडतील. आजच्या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांचे दैनंदिन कामकाज व त्यात येणाऱ्या अडीअडचणी व कामकाजासाठी आवश्‍यक असणारे ज्ञान या विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे. ज्येष्ठ जिल्हापरिषद सदस्य उदय बने या विषयासंबंधी मार्गदर्शन करतील. माजी सनदी अधिकारी बाळासाहेब जगताप स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकशाहीतील महत्त्व व लोकप्रतिनिधींची भूमिका कशी असली पाहिजे, यावर मार्गदर्शन करणार आहेत. 

शिबिराच्या दुसऱ्या सत्रात उद्योगमंत्री सुभाष देसाई शिवसेनेच्या नगरसेवकांना व आमदारांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन करतील तसेच गोंदियाचे अभिमन्यू काळे हे देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. कोकण विभागाचे उपायुक्त रवींद्र शिंदे हे विकासाची संकल्पना व लोकप्रतिनिधीमध्ये सहभाग कसा असावा यावर मार्गदर्शन करतील. या सगळ्या विषयांवर प्रामुख्याने प्रकाश टाकतील ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे विशेष मार्गदर्शन शिवसेनेच्या नेतेमंडळींना होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com