एक घाव दोन तुकडे! मिलिंद नार्वेकरांच्या राजकीय बॉम्बने खळबळ

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कनिष्ठ पुत्र तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी फोडलेल्या राजकीय बॉम्बने खळबळ उडाली आहे.
milind narvekar wishes tejas thackeray on his birthday
milind narvekar wishes tejas thackeray on his birthday

मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कनिष्ठ पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे (Shivsena) सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी फोडलेल्या राजकीय बॉम्बने खळबळ उडाली आहे. तेजस यांच्या वाढदिवसानिमित्त नार्वेकरांनी सामनाच्या पहिल्या पानावरच जाहिरात दिली आहे. त्यात एक घाव दोन तुकडे असे त्यांनी म्हटले असून, तेजस यांना शिवसेनेचे व्हिव्हियन रिचर्ड्स असे संबोधले आहे. 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे लहान भाऊ असलेले तेजस यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातूनच जाहिरातीच्या माध्यमातून नार्वेकरांनी शुभेच्छा दिल्याने खळबळ उडाली आहे.  हे त्यांचे राजकीय प्रवेशाचे संकेत आहेत, अशी शक्यता वर्तविली जात आहे. नार्वेकर ठाकरे कुटुंबाच्या जवळचे अन उध्दव ठाकरे यांची सावली मानले जातात. 

नार्वेकर यांनी जाहिरात देण्यामागे राजकीय उद्देश असल्याचे मानले जात आहे. त्यांना राजकीय संदेश देण्यासाठी जाहीरपणे या शुभेच्छा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यातच त्यांनी तेजस यांनी रिचर्ड्स असे का संबोधले यावर आता चर्चा सुरु झाली आहे. तेजस हे रिचर्ड्स याच्याप्रमाणे झुंजार आहेत, फलंदाजी करताना ते प्रत्येक बॉल आक्रमकपणे हाताळतात त्यामुळे मी ही उपमा दिली, असे नार्वेकर म्हणाले. ते रिचर्डस तर आदित्य यांना काय म्हणाल यावर त्यांनी ते सुनिल गावस्कर आहेत. अत्यंत संयमी, शांत आणि प्रगल्भ असे उत्तर नार्वेकरांनी दिले.

सध्या नार्वेकर सेनेच्या अंतर्गत राजकारणात काहीसे मागे पडल्याचे चित्र आहे. मात्र ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समवेत प्रत्येक दौऱ्यात असतात. यामुळे त्यांचे  शिवसेनेतील स्थान वारंवार अधोरोखित होते. त्यामुळे शिवसेनेला तेजस यांचे महापालिका निवडणुकीनिमित्त लॉंचिंग करायचे आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यासाठीच ही जाहिरात आहे का, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. मात्र, सध्या तेजस यांचा तसा विचार नाही. 

तेजस हे अत्यंत आक्रमक अन माझा वारसा चालवणारे असल्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सांगितल्याचे शिवसैनिकांच्या स्मरणात आहे. सध्या शिवसेनेत आदित्य आणि तेजसचे मावसभाऊ वरुण सरदेसाई हे सत्ताकेंद्र बनू लागल्याचे दिसत आहे. त्यांचे प्रस्थ वाढू लागल्याने काहींना तेजस यांनी राजकारणात यावे आणि मोठ्या भावाला मदत करावी असे काहींना वाटते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com