62 वर्षानंतर मिरजला मिळाली मंत्रिपदाची संधी 

विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने आमदार खाडे यांना दिलेली मंत्रिपदाची संधी निश्चितच लाभदायी ठरणार आहे.
62 वर्षानंतर मिरजला मिळाली मंत्रिपदाची संधी 

मिरज (सांगली) : तब्बल 62 वर्षानंतर आमदार सुरेश खाडे यांच्या माध्यमातून मिरज विधानसभा मतदारसंघास मंत्रिमंडळात स्थान मिळाले. आमदार सुरेश खाडे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघाची मंत्रिपदासाठीची गेल्या या सहा दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आली. आमदार खाडे यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या संधीमुळे मिरज विधानसभा मतदार संघाचे जिल्ह्यातील राजकीय वजन मात्र नव्याने वाढले आहे. 

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी 1957 झाली तत्कालीन मिरज विधानसभा मतदार संघ क्रमांक 86 मधून विजयी झालेले काँग्रेस पक्षाचे आमदार गुंडू दशरथ उर्फ बॅरिस्टर जी डी पाटील यांना त्याकाळी  राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. त्यानंतर तब्बल 62 वर्षांनी ही संधी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश खाडे यांच्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघास प्राप्त झाली. मिरजेच्या राजकारणावर असलेला जिल्हा नेत्यांचा वरचष्मा आणि सर्वच पक्षातील नेत्यांच्या मिरजला सातत्याने उपेक्षित ठेवण्याच्या भूमिकेमुळे मिरजेच्या आमदारांना यापूर्वी सतत मंत्रिमंडळापासून वंचित राहावे लागले. गेली तीस वर्षे तरी मिरजेच्या राजकारणाला कोणी वाली नसल्यासारखे चित्र होते.

सहाजिकच याचा लाभ नेते मंडळी घेत आणि मिरजेच्या आमदारांसह सर्वच प्रमुख पक्षातील कार्यकर्त्यांना पदाच्या संधीपासून वंचित राहावे लागे. माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्या कारकिर्दीत काही काळ तत्कालीन माजी मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांच्या गोटातून मंत्रिपदासाठी चर्चा होत असे.पण मंत्रिपदाचा ऐवजी साखर कारखाना देऊन त्यांची तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी बोळवण केली. त्यानंतर जनता दलाचे प्राध्यापक शरद पाटील हे सलग दोन वेळा मिरज  विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. जनता दल हा त्याकाळी काँग्रेसच्या प्रमुख विरोधी पक्ष असल्याने मंत्रिपदाची शक्यता दुरापास्तच राहिली.

त्यानंतर माजी आमदार हाफीज धत्तुरे याना मौलाना अब्दुल कलाम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्याने लाल दिव्याच्या गाडीचा आनंद मिरजेच्या राजकीय कार्यकर्त्यांनी घेतला. मिरज विधानसभा मतदारसंघातील आरक्षणामुळे तर मिरज मिरजेला मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा जवळ जवळ संपल्या सारख्याच होत्या. परंतु आमदार सुरेश खाडे यांनी आपल्या कर्तबगारीवर मिरज मतदारसंघावरील आपली मांड पक्की केली आणि हे मंत्रिपद खेचून आणले.
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com