Raj-Thakre-Bhujbal
Raj-Thakre-Bhujbal

मनसे आघाडीत राहील परंतु लोकसभा निवडणूक लढविणारच असे नाही : छगन भुजबळ

राज ठाकरेंसोबत माझी भेट झाली. ती भेट कौटुंबिक होती परंतु कौटुंबिक भेटीतही राजकारणावर चर्चा होतेच. -छगन भुजबळ

नागपूर :  मनसे प्रमुख राज ठाकरे यांची व्यंगचित्रे ही अनेक सभांपेक्षा परिणामकारक आहेत. मनसे आघाडीत राहील परंतु निवडणूक मैदानात नाही,असे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नागपुरात दिले.

 अमरावती येथील परिवतर्तन यात्रेत सहभाग घेऊन परत आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले,कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी निश्‍चित झाली आहे. समविचारी पक्षांसोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे महाआघाडीत सामील होणार काय, याप्रश्नावर भुजबळ म्हणाले," राज ठाकरेंसोबत माझी भेट झाली. ती भेट कौटुंबिक होती परंतु कौटुंबिक भेटीतही राजकारणावर चर्चा होतेच."

" पंतप्रधान मोदींवर राज ठाकरे तीव्र शब्दात प्रहार करीत आहेत. त्यांची व्यंगचित्रे सुद्धा टोकदार असतात. जे सभांच्या माध्यमातून परिणाम होत नाही तो राजच्या एकाच व्यंगचित्रांतून होतो. त्यामुळे मोदीविरोधक म्हणून राज ठाकरे ओळखले जातात. ते आघाडीत सामील होणार म्हणजे लोकसभा निवडणूक लढविणारच असे नाही. निवडणूक न लढविताही काही जण आघाडीत राहू शकतात," असे सांगत त्यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल आघाडीला ममत्व असल्याचे स्पष्ट केले आहे.

" 'पहले मंदिर फिर सरकार' या विधानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायम राहावे," असा सल्ला भुजबळ यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी अयोध्या येथे काही दिवसांपूर्वी सभा घेतली होती. याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले," उद्धव ठाकरे यांनी शब्दावर कायम राहिले पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडावे मग अशा घोषणा कराव्या", असा सल्ला भुजबळ यांनी दिला.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com