पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोफ बारामतीत धडाडणार! दहा एप्रिलचा दिवस ठरला...

 पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोफ बारामतीत धडाडणार! दहा एप्रिलचा दिवस ठरला...

मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपने गांभीर्याने घेतली असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा येत्या दहा एप्रिल रोजी बारामतीत होणार आहे. भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांच्या प्रचारासाठी मोदी हे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात तोफ डागणार आहे.

मोदींची सभा या वेळी बारामतीत होणार की नाही, याची उत्सुकता होती. त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत सभा घेतली होती. त्यावेळी शरद  पवार आणि अजित पवारांवर टीका केली होती. त्यानंतर ते एकदा बारामतीत येऊन गेले. त्या वेळी मात्र त्यांनी पवार यांचे कौतुक केले होेते.

बारामती मतदारसंघात भाजपने पहिल्यांदाच पवार कुटुंबियांच्या एकेकाळच्या समर्थकाच्या घरात उमेदवारी दिली आहे. रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी असलेल्या कांचन यांच्या विजयासाठी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, गिरीश बापट यांनी येथे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. आता मोदी यांच्या सभेला कसा प्रतिसाद मिळणार, याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com