नागपूर : भाजपचे नाराज आमदार आशीष देशमुख विधानभवनात आज त्यांचे वडील व माजी मंत्री रणजित देशमुखांसोबत आले. यावेळी आशीष देशमुख यांनी दोन बोट दाखवून व्हिक्टरीचे चिन्ह दाखविले तर रणजित देशमुखांनी 'पंजा' दाखविला. यामुळे आशीष देशमुखांची चांगलीच अडचण झाली.
गेल्या काही दिवसांपासून आमदार आशीष देशमुख भाजपवर नाराज असल्याचे वृत्त आहे. रा. स्व. संघाने आयोजित केलेल्या बौद्धिक वर्गालाही आमदार देशमुख हजर राहिले नाहीत. यामुळे भाजपने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नेत्यांच्या भेटी घेणे सुरू केले आहे.
आज दुपारी आशीष देशमुख वडीलांसह विधानभवनात आले. विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ दोघांनी छायाचित्रकारांना 'पोझ' दिली. यावेळी आशीष देशमुख यांनी दोन बोटे दाखवून विजयाची खूण दाखविली. त्याचवेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी 'पंजा' दाखविला. रणजित देशमुखांच्या या कृतीने सर्व छायाचित्रकार व पत्रकारांमध्ये हंशा पिकला.
आपली अडचण झाल्याची जाणीव आशीष देशमुख यांना लगेच झाली. त्यांनी रणजित देशमुखांच्या हात खाली करण्याचा प्रयत्न केला परंतु रणजित देशमुख यांनी मात्र पंजाच दाखविला. यामुळे कोणत्या पक्षात प्रवेश करावा, याबद्दल आशीष देशमुख संभ्रमात आहेत की, वडीलांचा कल कॉंग्रेसकडे आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.