नाना पटोलेंना पर्याय कोण?

भाजपचे खासदार नाना पटोले यांनी भाजप सोडण्याचा निश्‍चय केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजप कुणाला रिंगणात उतरविणार, याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे.
नाना पटोलेंना पर्याय कोण?

भंडारा : भाजपचे खासदार नाना पटोले यांनी भाजप सोडण्याचा निश्‍चय केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजप कुणाला रिंगणात उतरविणार, याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. भाजपने पटोलेंच्या वक्तव्यावर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. भाजपच्या कोणत्याही कार्यक्रमांना त्यांनी गेल्या सहा महिन्यात हजेरी लावलेली नाही. तसेच काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही ते उपस्थित राहिले नाही. यामुळे त्यांनी भाजपशी असलेले संबंध तोडल्यात जमा झाल्याचे समजते.

आता नाना पटोलेंना पर्याय कोण? यावर आता भाजपात चर्चा सुरू झाली आहे. यात दोन-तीन नावे प्रामुख्याने चर्चेत आली आहेत. भाजपातील चेहऱ्यांचा विचार केल्यास माजी खासदार शिशुपाल पटले यांचे नाव आघाडीवर आहे. पटले यांनी यापूर्वी भंडारा लोकसभा मतदारसंघातून पक्षाला विजय मिळवून दिला आहे. तसेच ते पोवार समाजाचे आहे. या समाजाचा जिल्ह्यात तसेच राजकारणातही प्रभाव आहे. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांना यावेळी संधी मिळू शकते.

त्याचप्रमाणे तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. वाघमारे हे काँग्रेसमधून आलेले असले तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. स्वच्छ प्रतिमा व अभ्यासू आमदार म्हणून ते जिल्ह्यात परिचित आहेत. या संदर्भात बोलताना वाघमारे म्हणाले, ''अद्यापही मला पक्षाने विचारणा केलेली नाही. सध्या मी तुमसर क्षेत्राचा आमदार आहे. या क्षेत्राच्या विकासामध्ये मला जास्त रस आहे.'' लोकसभा निवडणूक लढविणे माझ्या आवाक्‍याचे नसल्याची कबुली त्यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल भाजपचे उमेदवार राहू शकतात, अशी वदंता आहे. पटेल यांची भाजपशी जवळीक वाढत चालल्याने नाना पटोले भाजपच्या नेत्यांवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. या जवळीकीमुळेच पटोले भाजपपासून दूर जात असल्याचे बोलले जात आहे. प्रफुल्ल पटेल हे गुजरात निवडणुकीतही भाजपला मदत करणार असल्याचे समजते. गेल्या निवडणुकीत पटोले यांनी पटेल यांचा पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com