खोतकरांच्या मध्यस्थीनंतर आमदार जाधव यांचे विधानभवनाच्या पायऱ्यावरील ठिय्या आंदोलन मागे   

KHOTKAR--JADHAV
KHOTKAR--JADHAV

नागपूर :  उसाच्या प्रश्‍नावरील लक्षवेधी सूचना विधानसभेत बुधवारी मांडू न दिल्याने शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या दिला.

जवळपास दोन तास ठिय्या दिल्यानंतर ' लक्षवेधी' चर्चेला घेण्यात येईल, असे आश्‍वासन मिळाल्यानंतर जाधव यांनी आंदोलन मागे घेतले. 

नियम 293 अन्वये सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावावरून नाव कापल्याने संतप्त झालेल्या आशिष देशमुखांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली, तर हर्षवर्धन जाधव यांनी ' लक्षवेधी' नाकारल्यामुळे सभागृहाच्या बाहेर नापसंती व्यक्त केली. उसाच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे सदस्य हर्षवर्धन जाधव (कन्नड) यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

 विधानसभा अध्यक्षांनी ही 'लक्षवेधी' चर्चेसाठी घेतली नाही. यामुळे संतप्त झालेल्या हर्षवर्धन जाधव यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन ठिय्या दिला. सभागृहाच्या कामकाजात भाग न घेता जवळपास दोन तास ते पायऱ्यांवर बसून राहिले. शिवसेना नेते व पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मध्यस्थी केली. 

 अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत . हर्षवर्धन जाधव हे देखील शिवसेनेचे आमदार आहेत . हरिभाऊ बागडे हे भाजपचे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत . तिघांचेही मतदारसंघ जवळजवळ आहेत . 

अर्जुन खोतकर  यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना भेटून  हर्षवर्धन जाधव  यांची म्हणणे त्यांच्या कानावर घातले आणि त्यांना आमदार जाधवांच्या  लक्ष्यवेधीवर चर्चा करण्याबाबत विनंती केली .  विधानसभा अध्यक्षांनी उसाच्या प्रश्‍नावरील लक्षवेधी चर्चेला घेण्यास अनुमती दिली. विधानसभा अध्यक्षांच्या आश्‍वासनानंतर जाधव यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com