विधानसभेत सरकारविरोधी गोंधळात भाजपचे आशीष देशमुख सहभागी !

"सत्ताधारी पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी नियम 293 अन्वये प्रस्ताव दिला होता. त्यासाठी माझे नाव सुचविले होते. परंतु प्रस्ताव छापून आल्यानंतर त्यावर माझे नाव नव्हते. माझे नाव कां कापले, अशी विचारणा मी विधानसभा अध्यक्षांना केली. त्याचवेळी विरोधकही गोंधळ घालत होते. विरोधकांसोबत मी नव्हतो .-आशीष देशमुख
Ashish-Deshmukh
Ashish-Deshmukh

नागपूर :  विधानसभेत नियम 293 अन्वये सत्ताधारी पक्षातर्फे मांडलेल्या चर्चेच्या प्रस्तावावरून आशीष देशमुख यांचे नाव कापल्याने आज आशीष देशमुख यांनी विरोधकांसोबत विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन सरकारविरोधी भूमिका मांडली. यामुळे सत्ताधारी पक्षापुढे अडचणी निर्माण झाल्या. 

बोंडअळी व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरील विरोधकांनी मांडलेली लक्षवेधी सूचना पुढे ढकलल्याने विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांसमोर गोंधळ घातला. विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यानंतर भाजपचे आमदार आशीष देशमुख (काटोल) यांनीही वेलमध्ये येऊन विरोधकांना साथ दिली. 

लक्षवेधी सूचनेनंतर बोंडअळी व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सत्ताधारी पक्षातर्फे नियम 293 अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर आशीष देशमुख यांचे नाव नव्हते. या चर्चेच्या प्रस्तावावरून माझे नाव कां कापले, असा सवाल आशीष देशमुख यांनी विधानसभा अध्यक्षांना केला. भाजपचा आमदारच विरोधकांसोबत आल्याने सत्ताधारी पक्षासाठी अडचण निर्माण झाली होती. 

विरोधकांचा विरोध झुगारून विधानसभा अध्यक्षांनी बोंडअळीवरील लक्षवेधी गुरुवारी चर्चेला येईल, अशी घोषणा केली.  तरीही विरोधकांचे समाधान झाले नाही. मुख्यमंत्री मुद्याम शेतकऱ्यांच्यावर प्रश्‍नावर चर्चा टाळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. 

यासंदर्भात बोलताना आमदार आशीष देशमुख म्हणाले, "सत्ताधारी पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी नियम 293 अन्वये प्रस्ताव दिला होता. त्यासाठी माझे नाव सुचविले होते. परंतु प्रस्ताव छापून आल्यानंतर त्यावर माझे नाव नव्हते. माझे नाव कां कापले, अशी विचारणा मी विधानसभा अध्यक्षांना केली. त्याचवेळी विरोधकही गोंधळ घालत होते. विरोधकांसोबत मी नव्हतो, "असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आशिष देशमुख हे भाजपचे काटोलचे आमदार आहेत . काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत . ते  अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचे पदवीधर आहेत . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com