नाना पटोलेंचा मोदींना टोला : राहुल गांधींच्या घोषणांना घाबरले

राहुल गांधी यांच्या घोषणेमुळे घाबरलेल्या मोदी सरकारने घाईघाईत शेतकरी सन्मान योजना घोषित केली आहे.-नाना पटोले
Patole-Modi-
Patole-Modi-

नागपूर  :  शेतकरी सन्मान योजनेच्या नावावर शेतकऱ्यांना काहीही मिळणार नसून निवडणुकीपूर्वी दिलेला हा "जुमला' आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये मिळणार आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले, "मोदी सरकारने 2014 मध्ये दिलेल्या आश्‍वासनाची अद्यापही पूर्तता केलेली नाही. भाजपने शेतकऱ्यांना कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतमालांना दीडपट भाव देण्याच्या घोषणा 2014 मध्ये केल्या होत्या. या घोषणांची गेल्या 5 वर्षांत अंमलबजावणी झालेली नाही. याउलट भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी या घोषणा म्हणजे "जुमला' असतात, असे स्पष्ट केले होते. यामुळे आता या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा सुद्धा भविष्यात जुमलाच सिद्ध होणार आहे."

" कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी किमान उत्पन्न हमी योजनेची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली आहे. या योजना कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात समावेश होणार आहे. राहुल गांधी यांच्या या घोषणेमुळे घाबरलेल्या मोदी सरकारने घाईघाईत शेतकरी सन्मान योजना घोषित केली आहे. ही योजनाही संपूर्ण शेतकऱ्यांना दिलासा देणारी नाही. या योजनेसाठी शेतकऱ्यांना 2 हेक्‍टर म्हणजे 5 एकरची मर्यादा ठेवली आहे. या योजनेचा सुद्धा देशातील सर्व शेतकऱ्यांना फायदा मिळणार नाही ," असेही श्री .  पटोले यांनी सांगितले.


नोटाबंदी व जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. या स्थितीमध्ये केवळ मूठभर उद्योजकांसाठी देशाच्या बॅंका खुल्या केल्या होत्या. काही भांडवलदार मित्रांनी बॅंका लुटून परदेशात पळून गेले. त्यांच्याकडून पैशा काढून घेण्यासाठी मोदी सरकारने कोणत्याही कारवाई केली नाही, असा आरोपही पटोले यांनी केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com