नंदूरबार जिल्हा परिषदेत आश्‍चर्य ! कॉंग्रेस-सेनेला मिळाले थेट भाजपचे समर्थन !!!

....
 नंदूरबार जिल्हा परिषदेत आश्‍चर्य ! कॉंग्रेस-सेनेला मिळाले थेट भाजपचे समर्थन !!!

नंदूरबार : नंदूरबार जिल्हा परिषदेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण राहिलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने अचानक माघार घेत अध्यक्षपदासाठी कॉग्रेस-शिवसेनेच्या ऍड. सीमा पद्माकर वळवी यांना समर्थन दिले. त्यांना अध्यक्षपदासाठी सर्व 56 मते मिळाली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे राम रघुवंशी निवडून आले. 

उपाध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानावेळी मात्र भाजप आश्‍चर्यकारकरित्या तटस्थ राहिली. राम रघुवंशी यांना तीस मते पडली. तर भाजपच्या जयश्री दीपक पाटील यांना 26 मते मिळाली. या प्रक्रियेत हात उंचावून मतदान घेण्यात आले. अध्यक्षपदी कॉंग्रेस व शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा देत असल्यामुळे निवड बिनविरोध करावी अशी मागणीही भाजपने केली मात्र वेळेत माघार न घेतल्याने पीठासीन अध्यक्षांनी निवडणूक प्रक्रिया घेतली. 
जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर यंदाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. कॉंग्रेसला 23, भाजपला 23 आणि शिवसेनेला 7, राष्टवादीला तीन जागा मिळाल्या, त्यामुळे सत्तेच्या चावी शिवसेनेकडे आली होती. निवडणुकीनंतर शिवसेनेसह कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com