राणे जेंव्हा तरूण आमदारांची मने जिंकतात ! 

राणे जेंव्हा तरूण आमदारांची मने जिंकतात ! 

मुंबई : जीएसटीवरील भाषण ऐकण्यासाठी शिवसेनेसह सर्वच पक्षाच्या आमदारांनी आज विधानपरिषदेच्या प्रेक्षक गॅलरीत गर्दी केली होती. गेल्या तीन दिवसापासून विशेष अधिवेशन सुरू आहे. अप्रत्यक्ष कर आणि जीएसटी म्हणजे नेमके काय ? याविषयी या आमदाराना उत्सुकता होती. विधानसभेत मान्यवरांची भाषणे ऐकल्यानंतर हे आमदार विधानपरिषदेत गॅलरीत पोचले. 

हे सर्व तरूण आमदार राणे यांचा प्रत्येक शब्द आणि वाक्‍य गांभीर्याने ऐकत होते. तर काहीजण टिपण घेत होते. मुंबईसाठी जीएसटीमुळे होणारे नुकसान कसे भरून काढणार, जीएसटीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था लंगड्या होणार, राज्य आर्थिक भाराने कोलमडून जाईल आदी मुद्दे राणे आपल्या भाषणा स्पष्ट करीत होते. . 

राणेंना ऐकण्यासाठी विधानपरिषदेच्या गॅलरित उपस्थित असलेल्यांमध्ये भाजपचे आमदार उन्मेष पाटील, हरिभाऊ जावळे, आशिष देशमुख, शिवसेनेचे राजाभाऊ वाजे, उल्हास पाटील समीर कुनावर, बाळा काशीकर, सुधाकर कोळे, भास्कर जाधव, कॉंग्रेसच्या यधोमती ठाकूर, नितेश राणे आदींचा समावेश होता.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com