सांगलीत राष्ट्रवादीकडून सुमनताई पाटील?

दरवेळेस कदम गट आणि दादा गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असते
सांगलीत राष्ट्रवादीकडून सुमनताई पाटील?

पुणे: सांगली लोकसभा मतदारसंघातून तासगाव- कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील यांना उमेदवारी करण्याबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून विचारणा झाल्याचे वृत्त आहे. 

सांगली मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचा आहे, मात्र या मतदारसंघातून काँग्रेसकडून लढण्यासाठी मातब्बर उमेदवार लढण्यास इच्छूक नाही. परिणामी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याच्या मनस्थितीत काँग्रेस नेतृत्व आहे. त्यामुळे आमदार सुमनताई आर आर पाटील यांना रिंगणात उतरवण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे.

दरवेळेस कदम गट आणि दादा गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असते पण यावेळेस दोन्ही गटाकडून निवडणूक लढवायला नकार दिला जात आहे. अन्य पर्याय समोर येत आहेत मात्र ते तुल्यबळ नाहीत. सक्षम उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरत नसल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याबाबत हालचाली सुरु झाल्या. नगर आणि सांगली अदलाबदली करण्याबाबत निवडक नेत्यांची बैठक झाली. सांगलीची जागा मिळणार हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमदार सुमनताई पाटील यांनी लोकसभा लढवावी, अशी गळ घातल्याचे वृत्त आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com