जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांना मुंबईत प्रवेश बंदी

विर्लेपार्ले मिठीबाई कॉलेज येथील भाईदास सभागृहात आयोजित राष्ट्रीय छात्र संम्मेलन आज आयोजीत करण्यात आलेले आहे. मुंबई छात्रभारती अध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक सचिन बनसोडे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली असून 149 ची नोटीस देण्यात आलेली आहे. कार्यक्रमाची परवानगी नाकारली असल्याचे छात्र भारतीचे म्हणणे असून या साठी कोरेगाव भीमाच्या घटनेचे कारण पुढे केले आहे. काही संख्येत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांना मुंबईत प्रवेश बंदी

मुंबई छात्रभारती अध्यक्ष

सचिन बनसोडे यांना अटक

मुंबई : विर्लेपार्ले मिठीबाई कॉलेज येथील भाईदास सभागृहात आयोजित राष्ट्रीय छात्र संम्मेलन आज आयोजीत करण्यात आलेले आहे. मुंबई छात्रभारती अध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक सचिन बनसोडे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली असून 149 ची नोटीस देण्यात आलेली आहे. कार्यक्रमाची परवानगी नाकारली असल्याचे छात्र भारतीचे म्हणणे असून या साठी कोरेगाव भीमाच्या घटनेचे कारण पुढे केले आहे. काही संख्येत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

छात्रभारती आयोजित राष्ट्रीय छात्र सम्मेलन आज आयोजित करण्यात आले होते. कोरेगाव भीमा प्रकरण आणि महाराष्ट्र बंद नंतर जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होते. दोघांनी काल शांततेचं आवाहन केले होते. आज 4 जानेवारीला छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र सम्मेलनाला दोघेही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. विलेपार्लेच्या भाईदास सभागृहात  सकाळी 11 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे सम्मेलन पार पडणार होते. या संमेलनात विद्यार्थी नेत्या रिचा सिंग, प्रदीप नरवाल, बेदाब्रता गोगई आणि छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत असे जाहिर करण्यात आले होते.

दिवसभर चालणाऱ्या या सम्मेलनात शिक्षण व्यवस्था, विद्यार्थी चळवळ आणि विद्यार्थ्यांच्या कळीच्या प्रश्नांवर विचारमंथन, सम्मेलनात युवा शायर फैजान अंजुम, रमणिक सिंग, मोहम्मद सदरीवाला यांचा 'कुछ नज्मे और कुछ बाते' असा बहारदार कार्यक्रमही होणार होता. समारोपाच्या वेळी आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांचा सत्कार आयोजीत होता. राज्यभरातून विविध कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या सम्मेलनात सहभागी होण्यास आलेले आहेत. संलनाचे स्वागताध्यक्ष सिद्धार्थ मल्या, निमंत्रक सागर भालेराव, सहनिमंत्रक सचिन बनसोडे, नीलकबीर, आदित्य मदनानी, रोहित ढाले, अमरीन मोगर आहेत.

मुंबई छात्रभारती अध्यक्ष कार्यक्रमाची आयोजक सचिन बनसोडे यांना अटक करण्यात आली असून. पोलिसाकडून 149 ची नोटीस बजावण्यात आलेली आहे. काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मुंबईतील जिग्नेश मेवानी, उमर खालिद यांच्या भाषणाला पोलिसांचा विरोध असून जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com