Bindre---Kurundkar
Bindre---Kurundkar

अश्विनी बिंद्रे खून प्रकरणी अभय कुरुंदकरला बडतर्फ करणार - रणजीत पाटील

मुंबई  :  सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे- गोरे यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर यांचे चौकशीच्या काळातच पोलिस निरिक्षक पदावरून निलंबन झालेले आहे.  कुरूंदकर यांना देण्यात आलेले राष्ट्रपती पदकही परत घेण्याबाबत आम्ही केंद्र सरकारकडे शिफारस केलेली आहे.  तसेच त्याला सेवेतून बडतर्फ करण्याबाबत सेवानियम तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहीती  गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी  विधान परिषदेत दिली.

 त्याचबरोबर बिंद्रे यांची हत्येनंतर त्यांचा मृतदेहाचे तुकडे करून वसई खाडीत टाकून दिल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यानुसार नौदलाच्या मदतीने मृतदेहाचा शोध सुरू आहे. या हत्या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असेही रणजित पाटील यांनी स्पष्ट केले.

बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात कुरुंदकरचा  हात असल्याचे स्पष्ट झाल्यावरही त्याला वाचविण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेवरचाच लोकांचा विशेषतः महिलांचा विश्वास उडत चालला आहे. हे लक्षात घेता संबंधितांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी सदस्य हेमंत टकले,  हुस्नबानू खलिफे यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे  केली. तर चंद्रकांत रघुवंशी यांनी या प्रकरणाच्या संदर्भाने तीन आमदारांची बैठक झाल्याची चर्चा असून ते कोण आहेत, त्यांची माहिती देण्याची मागणी केली. 

या प्रकरणाच्या संदर्भाने तीन आमदारांची बैठक झाल्याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे गृहराज्यमंत्री पाटील यांनी  दिली. या प्रकरणात कुरुंदकर, राजू पाटील, कुंदन भंडारी, महेश फळणीकर या चौघांना अटक करण्यात आली आहे.  कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांनी दिलेल्या माहितीवरून कुरुंदकर यांच्या भाईंदर येथील घरातून आवश्यक ते पुरावे गोळा करण्यात आले असून न्यायवैद्यक प्रयोग शाळेत त्याची तपासणी करण्यात येत आहे. कुरुंदकर यांचे राष्ट्रपती पदक काढून घेण्याबाबत तातडीने कारवाई करण्यात येईल असे गृहराज्यमंत्री रंणजीत पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com