तुपकरांच्या राजीनाम्यामुळे सदाभाऊं भोवतीचा फास आवळला

sadabhau-khot
sadabhau-khot

मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊं बाबतची सुत्रे आता वेगाने हलविली जात आहेत. संघटनेचे सदस्य व वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपविला.

त्यामुळे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भोवतीचा फास आवळला जात असल्याचे म्हटले जात आहे. येत्या दोन दिवसांत शेट्टी-खोत वादाचा अंतिम निकाल लोकांपर्यंत येण्याची शक्यता आहे. 

गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शेतकरी कर्जमाफीबाबत नाराजीचा सुर होता. सरकार केवळ आकडेवारींचा खेळ करत शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत आहे. म्हणून मी माझा राजीनामा राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला.

राजू शेट्टींच्या नेर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. पक्षातील २ सदस्य सध्या सत्तेत असल्यामुळे माझा राजीनामा दिला आहे. पक्षापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न माझ्यादृष्टिने जास्त महत्वाचे आहेत. कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या ताकदीवर मी नेता झालो. अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी 'सरकारनामा' शी बोलताना दिली.

गेल्या काही काळात महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. सातबारा कोरा झाला पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप पुकारला होता. यानंतर सरकारने देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पण त्यामध्ये अनेक निकष घातले.

या सर्व संपा दरम्यान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कुठे दिसलेच नाहीत. त्यामुळे शेतकरी नेता म्हणवणाऱ्या सदाभाऊंना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सदाभाऊंना देण्यात आलेली मुदत ४जुलै ला संपत असून ते संघटनेबाबत आपली काय भूमिका मांडणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com