काॅंग्रेस राष्ट्रवादीचा असा कसा सेक्युलरिझम?: प्रकाश आंबेडकर 

..
Balasaheb-Ambedkar-@-Nanded
Balasaheb-Ambedkar-@-Nanded

नांदेड :  "सेक्युलरिझमवरचा हस्तक्षेप काॅंग्रेस राष्ट्रवादी उघड्या डोळ्यांनी पाहत होते. त्यांना दलित मुस्लिमांची मते हवी आहेत. मात्र त्यांना या समाजाचे उमेदवार नकोत.  आम्ही तब्बल २८ मुस्लिम व इतर अठरापगड जातींचे उमेदवार दिले आहेत. आता खर्या अर्थाने एकमेकांना मते द्यायला हवीत. ती जर दिली नाहीत तर हा कसला तुमचा सेक्युलरिझम?", असा सवाल वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. 

नांदेड येथील देगलूर नाका भागात वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते आज दुपारी बोलत होते. सभेला हजारोंची गर्दी होती . ते पुढे म्हणाले , " तुमचं एक मत जरी फुटलं तरी नको असलेलं सरकार सत्तेवर येईल. एमआयएम सोबत युती व्हावी अशी माझीही इच्छा होती. मात्र मी निवडून दिलेल्या खासदाराचा वापर इतर पक्ष करून घेत होते. मग तुम्ही त्यांना मुस्लिम म्हणून प्रश्न विचारणार की नाही? "

" धर्मांधतेला गाडल्याशिवाय इथला सेक्युलरिझम व सामान्य माणूस सुखी राहू शकत नाही. त्यामुळे आपल्या मतांचा केवळ वापर करनार्या पक्षांना जागा दाखविण्याची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता मानणारया सर्व  जातीधर्मातील मतदारांनी वंचितच्या उमेदवारांना मते द्यावीत", असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

व्यासपीठावर नांदेड दक्षिणचे उमेदवार फारूख अहमद व नांदेड उत्तर मुकुंद चावरे, देगलूरचे उमेदवार प्रा. रामचंद्र भरांडे, स्टार प्रचारक प्रशांत इंगोले आदी हजर होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com