रोज अफवा उठवायचे बंद करा, 3 जागा देणार असाल तर बोला!

या जागा मिळाल्या नाहीत तर मग आमची काँग्रेस-राष्ट्रवादीशी थेट लढत होईल.
रोज अफवा उठवायचे बंद करा, 3 जागा देणार असाल तर बोला!

पुणे :" हातकणंगले, वर्धा आणि बुलढाणा या जागा आम्हाला सोडल्या नाहीत तर आम्ही राज्यातील सर्व जागा लढवणार आहोत"असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

शेट्टी म्हणाले, "आमची आणि काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली, अशा रोज अफवा उठत आहेत. मात्र आमची आणि त्यांची अधिकृत आघाडी झालेली नाही. आम्हाला तीन जागा हव्या आहेत. त्या तीन जागावर आम्ही ठाम आहोत. आम्हाला जर या तीन जागा दिल्या नाहीत तर राज्यातील सर्व जागा आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. तिथले आमचे उमेदवार ठरलेले आहेत." 

माढा मतदारसंघाबाबत शेट्टी म्हणाले,"आम्हाला माढापेक्षा हातकणंगले, वर्धा आणि बुलढाणा हे मतदारसंघ हवे आहेत आणि ते कार्यकर्त्यांसाठी हवे आहेत. आणि आम्हाला जर या जागा मिळाल्या नाहीत तर मग आमची काँग्रेस-राष्ट्रवादीशी थेट लढत होईल."  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com