खडसेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत दानवेंचे 'कानावर हात' 

चार दशकांपूर्वी कॉंग्रेसवाले इंदिरा गांधींचे नाव घेत आपल्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? असे विचारत होते. आता स्थिती उलट झाली आहे. आता आपणच त्यांना विचारतोय 'तुमचा उमेदवार कोण?' त्यांच्याकडे पंतप्रधानपदासाठी दहा उमेदवार असल्याची टीका दानवेंनी या पत्रकार परिषदेनंतर झालेल्या पक्षाच्या बैठकीत केली.
khadse_Danve.
khadse_Danve.

जळगाव  : " नाथाभाऊ आमच्या पक्षातील राज्याचे ज्येष्ठ नेत आहेत, त्यांच्यावरील एकही आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही. मात्र, त्यांच्यासंबंधीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पक्ष त्यात काही करु शकत नाही ", असे सांगत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी यांनी एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळ विस्तारातील प्रवेशाबाबत पुन्हा एकदा ' कानावर हात' ठेवले. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभर दौऱ्यावर निघालेल्या दानवेंनी आज रावेर व जळगाव लोकसभा क्षेत्राचा आढावा घेतला.

यादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत खडसेंबाबत पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, याबद्दल विचारले असता ते म्हणाले, "खडसे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांच्यासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पक्षाला काही करता येत नाही. योग्यवेळी पक्ष त्यासंदर्भात भूमिका घेईलच". 

शिवसेनेशी युतीबाबत छेडले असता दानवे म्हणाले," मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करण्याची आमची भूमिका आहे. असे असले तरी आम्ही निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच मतदारसंघांमध्ये संघटनेचा आढावा सुरु केला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका असल्याने त्या मतदारसंघांमध्येही आमचे काम सुरु  आहे ."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com