शेतकरी कोण हे रेशीमबागेत ठरणार काय? - राजू शेट्टी

मंत्र्यांचा कार्यक्रम होऊ देऊ नकाआज झालेल्या मेळाव्यात सुकानु समितीने आजपासून राज्यात कोणत्याही मंत्र्यांचा कार्यक्रम होऊ न देता येणा-या मंत्र्याला कर्जंमाफीविषयी विचारले जाईल. येत्या 12 जूनला जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयांपुढे धरणे धरण्यात येतील. 13 जूनला रास्ता रोको व रेल रोके करण्यात येईल. त्यानंतरही सातबारा कोरा न झाल्यास तीव्र आंदोलन होईल.
शेतकरी कोण हे रेशीमबागेत ठरणार काय?  - राजू शेट्टी

नाशिक:  मुख्यमंत्री मी खऱ्या शेतकऱ्यांशीच चर्चा करेन. आता शेतकऱ्यांनी शेतकरी असल्याचा दाखला घेण्यासाठी रेशमीबागेत जायचे काय?. असा प्रश्‍न करुन जेव्हढे दिवस कर्जमाफी लांबवाल तेव्हढे तुमचे दिवस वाईट जातील असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज सरकारला दिला. 

शेतकरी संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज येथे राज्यातील सुकाणू समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. यावेळी विविध संघटनांचे नेते, प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, "नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्याआधी मोठी स्वप्न दाखवत स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करीन. शेतीमालाला उत्पन्नावर आधारीत पन्नास टक्के अधिक भाव देऊ असे घोषणा त्यांनी केली होती. आता मात्र त्यांनी घुमजाव करुन मतदात्यांची फसवणूक केली. एक तर मोदींना शेतीचे काहीच कळत नाही किंवा स्वामीनाथन आयोग समजला नाही. यातील काय खरे हे भाजपने जाहीर करावे. 

शेट्टी म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणतात शेतकरी संपात गुंड शिरले आहेत. सर्वात मोठा गुंड तर मीच आहे. माझ्यावर असंख्य गुन्हे आहेत. फडणवीस स्वप्न पाहात आहेत की, शेतकऱ्यांवर वारेमाप गुन्हे दाखल करीत आहेत. नंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांना तुमचे गुन्हे मागे घेतो अशी लालुच दाखवुन भाजपमध्ये इनकमींग करु असा त्यांचा स्वप्न असेल. मात्र यापुढे भाजपमध्ये काळ कुत्र सुध्दा जाणार नाही. तुमची आउटगोईंग सुरु होईल असा इशारा दिला. 

यावेळी आमदार बच्चु कडू, जयंत पाटील (शेकाप), बी. जी. कोळसे पाटील, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, रामचंद्रबापू पाटील, अशोक ढवळे (किसान सभा), बालासाहेब चव्हाण (पुनतांबे), हंसराज वडघुले (स्वाभीमानी शेतकरी संघटना), संजय भोर (मराठा क्रांती मोर्चा), सुशिलाताई नरवडे (मराठवाडा), विश्वनाथ पाटील, मनोज आथरे यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कॉंग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांसह विविध नेत उपस्थित होते. उपस्थितांच्या आग्रहामुळे त्याना व्यासपीठावर मज्जाव केल्याने ते उपस्थितांत बसले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com