शिर्डी साईबाबा मंदिराचे अधिकारी राजेंद्र जगताप  यांच्यावर  विनयभंगाचा गुन्हा

*
Shirdi Jagtap
Shirdi Jagtap

शिर्डी : साईबाबा मंदिराचे अधिकारी राजेंद्र जगताप यांचेवर एका स्थानिक प्रतिष्ठित महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असुन जगताप यांच्या निलंबनाची मागणी पिडीत महिलेने केली आहे. 

साईबाबांच्या पालखी सोहळ्याच्या वेळी गुरुवारी रात्रीसाडे आठ  वाजेच्या दरम्यान मंदिरात उभे असताना मंदिराचे अधिकारी राजेंद्र जगताप यांनी मला आणि सोबत असलेल्या सहका-यांचे हात ओढत असभ्य वर्तन केले आणि ढकलुन दिले .राजेंद्र जगताप हे नेहमीच असभ्य वर्तन करतात असा आरोप पिडीत महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केला आहे. 

राजेंद्र जगताप हे गेल्या २५ वर्षापासुन साईबाबा संस्थान मध्ये नोकरीस आहेत. गेल्या चार वर्षापासुन ते मंदिर प्रभारी आहेत. संस्थानच्या कामगार सोसायटीचे ते ८ वर्ष चेअरमन देखील राहिले आहेत.त्यांचेवर महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जगताप यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी पिडीत महिलेने केली आहे .

 शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे . महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी भादवी कलम 354 , 323 , 504 , 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या राजेंद्र जगताप फरार अाहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com