आमदार जयकुमार गोरेंनी रामराजेंवर तोफ डागली : म्हणे एक टीएमसी पाण्याचा  भगीरथ  !

jaykumar_gore_rajaram_nimbalkar.
jaykumar_gore_rajaram_nimbalkar.

फलटण शहर :  "  रामराजे निंबाळकर  21 वर्षे सत्तेत मंत्री व इतर पदावर असतानाही दुष्काळी भागाला पाणी देऊ शकले नाहीत, तर त्यांना भगीरथ कसे म्हणायचे? एक टीएमसी पाण्यात भगीरथ म्हणविणारा सर्वात मोठा कलंक आहे," असा आरोप आमदार जयकुमारगोरे यांनी केला.

नीरा- देवघर प्रकल्पातील कालवे पूर्ण करून लाभार्थींना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी नीरा- देवघर संघर्ष  समितीने फलटण शहरात मोर्चा काढून प्रांताधिकारी संतोष जाधव यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत
आमदार गोरे बोलत होते.

येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर, ऍड. बाळासाहेब बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली व नीरा- देवघर संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम यांच्या
अध्यक्षतेखाली मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाकडे नेला. या वेळी  "पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे' अशा घोषणा देत रणजितसिंह नाईक- निंबाळकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष जयकुमार शिंदे, बाळासाहेब कदम, धनंजय साळुंखे, संतोष गावडे, अमित रणवरे, माऊली नाळे यांच्यासह नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.


आमदार जयकुमार गोरे सभेत बोलताना पुढे म्हणाले, ""अनेक वर्षांपासून ज्या पाण्यासाठी संघर्ष होतोय तो
नीरा देवघरचा प्रकल्प 2000 मध्ये पूर्ण झाला, तरीसुद्धा 17 वर्षांनंतर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना आजही मोर्चा काढावा लागत आहे, ही बाब लाजीरवाणी आहे. दुष्काळी पट्ट्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. ज्यांच्याकडे कृष्णा खोरे होते, त्या वेळी त्यांनी काय केले?

देवघर प्रकल्पातील भगीरथांनी जनतेसाठी प्रयत्न केला; परंतु या भगीरथाने इनामे इतबारे पाणी बारामतीला वळविळे. 21 वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी दीड किलोमीटर काम केले असते, तर पाणी तालुक्‍यात आले असते. दुष्काळी भागातील मंत्री 21 वर्षे सत्तेत असतानाही पाणी येऊ शकत नसेल तर त्यांना भगीरथ कसे म्हणायचे? एक टीएमसी पाण्यात भगीरथ म्हणविणारा सर्वात मोठा कलंक आहे. आज 80 टक्के पाणी बारामतीला जातेय. एकीकडे बारामतीकर शेतकऱ्यांसाठी झटताहेत, तर इकडे स्वाभिमान विकून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले जातेय. त्यांना धडा शिकविला पाहिजे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com