उदयनराजेंबद्दल रामराजेंना चुकीचे मार्गदर्शन : शरद पवार

उदयनराजेंबद्दल रामराजेंना चुकीचे मार्गदर्शन : शरद पवार

सातारा : खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद मिटविण्यात आला होता. तरीही काही लोक रामराजेंना चुकीचे मार्गदर्शन करतात, हे मला काही कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा वाद मिटविण्यासाठी नेमकी कोणाची काय भूमिका आहे, हे समजून घेऊन त्यावर तोडगा काढावा लागले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिले. 

रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद आजही कायम आहे. त्यामुळे रामराजे नाराज असल्याचे त्यांनी बोलून दाखविले होते. यावर प्रश्‍नावर शरद पवार म्हणाले, ``रामराजे व उदयनराजेंमधील वाद आमच्या घरी बसून मिटविण्यात आला होता. त्यावेळी दोघांनीही गळाभेट घेतल्याचे मी पाहिले आहे. आता मला कार्यकर्ते सांगतात की काही लोक रामराजेंना चुकीचे मार्गदर्शन करतात. आता काही वाद असेल तर, पहावा लागेल.``

``नेमकी कोणाची काय भुमिका आहेत हे समजून घ्यावे लागेल. दोघांच्या काय तक्रारी आहेत ते समजून घेऊन त्यावर तोडगा काढावा, लागेल, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजेंवर कोणती जबाबदारी दिली जाणार आहे का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, अद्याप तसे काहीही ठरलेले नाही. माझी आणि त्यांची उद्या, परवा भेट होणार आहे. त्या वेळी पुढील काय ते ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com