शरद पवार यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले : फडणवीस यांची टीका

शरद पवार यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले : फडणवीस यांची टीका

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये होणाऱ्या `इनकमिंग`चे समर्थन करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला चढविला. शरद पवार यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यातच आयुष्य खर्ची केले, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

महाजनादेश यात्रेदरम्यान ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्रपणे संवाद साधत आहेत. यात `इकाॅनाॅमिक टाइम्स`ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी ही टीका केली आहे.

भाजपमध्ये दोन्ही काॅंग्रेसच्या नेत्यांना आयात करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप पवार यांनी फडणवीस यांनी केला होता. हा आरोप फेटाळून लावताना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे फक्त चार आमदार भाजपमध्ये आल्याचे सांगत या आमदारांची कोणत्याही प्रकरणात चौकशी सुरू नसल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांनी फोडाफोडीसाठी आयुष्य खर्ची केले. आता परिस्थिती बदलली आहे. पवार यांच्या नेतृत्त्वावर त्यांच्या लोकांचा विश्वास नसल्याने ते पक्ष सोडत असल्याचा दावा केला.

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची गरज असते.  मात्र दोन्ही काॅंग्रेसच्या नेत्यांचा जनतेशी संपर्क तुटला आहे. विरोधकांची जागा आता छोट्या संघटनांनी घेतली असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. पक्षांची धोरणे व विचार वाईट असू शकतात. पण प्रत्येक पक्षात काही चांगले लोक असतात. अशा चांगल्या लोकांना घेण्यात काय अडचण आहे, असे समर्थन त्यांनी नेत्यांच्या भाजप प्रवेशावर केले. 

महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोलीत रात्रीचा मुक्काम केला. येथील विकास महत्त्वाचा आहे, असा संदेश देण्यासाठी ही कृती केल्याचे त्यांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com