शिवसेनेच्या पाठिंब्या अभावी रहाटकरांची माघार   

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची अतिरिक्त मते मिळतील याची खात्री नसल्याने भाजपच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला असल्याची माहिती समजते.
Rahatkar-issue
Rahatkar-issue

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या  निवडणुकीत शिवसेनेची अतिरिक्त मते मिळतील याची खात्री नसल्याने भाजपच्या  नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा   विजया रहाटकर यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला असल्याची माहिती समजते.      

 'सामना'या शिवसेनेच्या मुखपत्रात छापून येते, त्यावर लक्ष देऊ नका. यापुढे शिवसेना -भाजप एकत्र निवडणूक लढवणार,असे मार्मिकपणे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले होते  प्रत्यक्षात शिवसेना  -भाजपमध्ये युतीबाबत मनोमिलन नाही हे आज पुन्हा दिसून आले. भाजपने राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देताना सेनेची मते गृहीत धरली  होती.

मात्र , रहाटकर यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सेनेकडून रहाटकर यांच्या उमेदवारीबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांचे कार्यालय वांद्रे येथे असले तरी वांद्र्याच्या मातोश्रीकडून पाठिंब्याचा शेवटपर्यंत हिरवा कंदील दिला नसल्याने राज्यसभेच्या निवडणुकीत नामुष्की होऊ नये म्हणून भाजपने अर्ज मागे  घेतल्याचे समजते.    
    
 शिवसेनेचे विधानसभेतील संख्या बळ 63 असून किमान 42 मतांच्या कोट्यावर अनिल देसाई हे सहज निवडून येणार होते. परंतु सेनेची 21 अतिरिक्त मते आणि 8 ते 10 अपक्ष आमदार यांना गृहीत धरून भाजपने चौथा उमेदवार टाकण्याचा प्रयत्न केला परंतु , शिवसेनेचा पाठिंबा जाहीरपणे न मिळाल्याने भाजपाने आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी रहाटकर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले.   

  शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे हायात असताना शिवसेनेवर टीका करणाऱ्या पत्रकारांमध्ये कुमार केतकर आणि निखिल वागळे यांची नावे घेतली जात असत. भाजपच्या चौथ्या उमेदवारीमुळे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार केतकर हे डेंजर झोन मध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु भाजपचा  चौथा उमेदवार रिंगणातुन बाहेर पडल्याने केतकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, सेनेची त्यांना अप्रत्यक्ष मदत झाल्याचे दिसून आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com