'सावंतसेने'ला महेश कोठे देणार धक्का!

गेल्या चार-पाच वर्षांपासून सोलापूर शहरात शिवसेनेच्या संघटन बांधणीसाठी धडपडणाऱ्या महेश कोठे यांना शहर मध्य मतदार संघातून उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसैनिक, कोठे समर्थकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी कोठेंना डावलून माजी आमदार दिलीप माने यांना संधी दिल्याने येणाऱ्या काळात शिवसेनेची ताकद कमी होण्याची शक्‍यता आहे.
Tanaji Sawant - Mahesh Kothe Solapur
Tanaji Sawant - Mahesh Kothe Solapur

सोलापूर : गेल्या चार-पाच वर्षांपासून सोलापूर शहरात शिवसेनेच्या संघटन बांधणीसाठी धडपडणाऱ्या महेश कोठे यांना शहर मध्य मतदार संघातून उमेदवारी नाकारल्यामुळे शिवसैनिक, कोठे समर्थकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी कोठेंना डावलून माजी आमदार दिलीप माने यांना संधी दिल्याने येणाऱ्या काळात शिवसेनेची ताकद कमी होण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून आमदार होण्यासाठी महेश कोठे प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेस सोडून शिवसेनेत आल्यानंतर कोठे यांनी शहरात विशेषतः: शहर मध्य विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या शाखांची उभारणी केली. नव्या, जुन्यांसोबत घेऊन शिवसेना वाढविण्यासाठी धडपड केली. शिवसेना नगरसेवकांची संख्या वाढविली. गेल्या काही दिवसांपासून कोठे यांनी शहर मध्य विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले होते. 

उमेदवारी मिळेल या आशेने त्यांनी तयारीही केली होती. नगरसेवकांनीही पक्षश्रेष्ठींना भेटून उमेदवारीसाठी विनंती केली, पण संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी कोठे यांच्याकडे दुर्लक्ष करत गेल्या महिन्यात कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या दिलीप माने यांना उमेदवारी दिली. 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांनी कोठे यांना दिलेला ए.बी.फॉर्म सावंत यांनी काढून घेतला. उमेदवारी दिली नाही, शिवाय कोठे यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्याचा सावंत यांनी केल्याचे दिसून येत आहे. शिवसेना वाढविण्यासाठी सावंतसेना वाढविण्याचा हा प्रकार असल्याचे सक्रिय शिवसैनिकांचे म्हणणे आहे. कोठे यांना उमेदवारी न मिळाल्याचा परिणाम शहर शिवसेनेवर नक्कीच होणार आहे. 

त्यांच्या मागे १८ नगरसेवक आहेत. शिवाय समर्थकांचा मोठा समूह त्यांच्यासोबत आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर अनेकांनी सोशल मीडीयावर थेट सावंतांच्या विरोधात बोलायला सुरवात केली आहे. दिलीप माने यांना कोठे समर्थक मदत करणार नाहीत. त्यांच्या अडचणी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. येणाऱ्या काळात कोठे यांच्याकडून सावंतसेनेला नक्कीच धक्का दिला जाईल यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com