...तर सोलापूरच्या भाजपच्या महापौर पालकमंत्र्यांविरुद्ध अपक्ष लढणार!

उत्तर विधानसभा मतदारसंघ सध्या वेगवेगळ्या कारणांनी गाजतोय. मतदारसंघ पालकमंत्री विजय देशमुखांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, या मतदारसंघातुन सोलापूरच्या विद्यमान महापौर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पालकमंत्र्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात उभे ठाकणार असल्याचा इशारा महापौर शोभा बनशेट्टी यांनी पालकमंत्र्यांना दिला आहे.
Vijaykumar Deshmukh- Shobha Banshetti
Vijaykumar Deshmukh- Shobha Banshetti

सोलापूर: उत्तर विधानसभा मतदारसंघ सध्या वेगवेगळ्या कारणांनी गाजतोय. मतदारसंघ पालकमंत्री विजय देशमुखांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, या मतदारसंघातुन  सोलापूरच्या विद्यमान महापौर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पालकमंत्र्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात उभे ठाकणार असल्याचा इशारा महापौर शोभा बनशेट्टी यांनी पालकमंत्र्यांना दिला आहे.

विद्यमान आमदार तथा पालकमंत्री विजय देशमुख यांनी सलग तीन वेळा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. विधानसभा 2014 मध्ये त्यांनी विक्रमी मते मिळवली होती. मागील अनेक वर्षांपासून ‘उत्तर’ मधून आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं सोलापूरच्या भाजपच्या महिला महापौर शोभा बनशेट्टी यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं होतं. विविध कार्यक्रमातून भावी आमदारकीचा मनोदय व्यक्त केला होता. 

हे देखिल वाचा- 

पंधरा वर्षात पालकमंत्र्यांनी काहीच ठोस काम केले नाही. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये. पालकमंत्र्यांना सोडून इतर कोणालाही उमेदवारी द्यावी,आम्ही पक्षाचे काम करू. मात्र त्यांनाच उमेदवारी दिली तर, त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करू म्हणत महापौर बनशेट्टी यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

महापौर बनशेट्टी या सहकारमंत्र्यांच्या कट्टर समर्थक आहेत. सोलापुरात पालकमंत्री आणि सहकारमंत्री असे दोन वेगवेगळे गट आहेत. मात्र पक्षश्रेष्टी कुणाच्या पारड्यात उमेदवारी टाकतं? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com