संजय शिंदेंनी टाळले  राष्ट्रवादीचे नाव; आता अपक्ष म्हणून लढणार

Sanjay Shinde Madha
Sanjay Shinde Madha

सोलापूर : राष्ट्रवादीचे नावही न घेता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचे आज जाहीर केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर शिंदे यांनी त्याच ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता ते विधानसभेच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरत आहेत.

विधानसभेच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात शिंदे यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारी आपल्याकडे होत्या. चांगल्या कामाची ही पावती होती. आपण निर्णय घेऊन लोकसभा लढवली. राष्ट्रवादीचा उल्लेख टाळत ते म्हणाले, "बागल गटाबरोबर एका पक्षाकडून निवडणूक लढवली. बागल गटाने चांगले काम केले.लोकसभा निवडणुकीवेळी शिंदे विधानसभेला मदत करतील, या भावनेनी बागल यांनी प्रमाणिक काम केले.'' 

निवडणुकीत शिंदेंचा पराभव झाल्यानंतर विधानसभेसाठी शिंदेच्या कार्यकर्त्यांनी हालचाली सुरु केल्या. त्यात अस्वस्थ झालेल्या बागल यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी सोडताना बागल यांचे कार्यकर्ते इतर कारणामध्ये हे एक कारण सांगत होते. बागल शिवसेनेत गेल्याने शिंदे यांचा राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात होते. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीला नाकारत अपक्षचा नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पवार हे माढ्यातून उभारणार अशी चर्चा होती. मात्र त्यांनी उमेदवारी दाखल केली नव्हती.

२०१४ च्या विधानसभेवेळी करमाळा मतदारसंघात शिंदे, आमदार नारायण पाटील, बागल, जयवंतराव जगताप यांच्यात प्रमुख लढत झाली होती. त्यात पाटील यांनी बाजी मारली होती. शिंदे यावेळी अपक्ष उतरत असल्याने नेमके काय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com