पुर्णा घटनेचे औरंगाबादेत पडसाद ; बसवर दगडफेक

पुर्णा घटनेचे औरंगाबादेत पडसाद ; बसवर दगडफेक

औरंगाबाद : शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद रविवारी (ता.16) औरंगाबादेत उमटले. दुपारी कळंब येथून औरंगाबादला येणाऱ्या कळंब-औरंगाबाद बसवर चिकलठाणा परिसरातील धूत रुग्णालयासमोर दगडफेक करण्यात आली. पूर्णा येथील मिरवणुकीवर झालेल्या 
दगडफेकीचे व पॅंथर सेनेचे पोस्टर हल्लेखोरांनी बसच्या काचेवर लावून घटनास्थळावरून पळ काढला. सुदैवाने या दगडफेकीत कुणीही जखमी झाले नाही, पण या घटनेमुळे प्रवाशांमध्ये दहशत पसरली होती. 

कळंबहून औरंगाबादकडे येणारी ही बस धूत रुग्णालयाच्या चौकात प्रवासी उतरविण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी पाच ते सात जणांच्या एका गटाने बससमोर येत दगड फेकली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे भेदरलेल्या चालक व प्रवाशांनी आरडाओरड करताच दगडफेक करणारे टोळके पळून गेले. या दगडफेकीची तक्रार बसचालकाने चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com