सुनील तटकरे यांनी रात्री दोन वाजता केला चंद्रकांत पाटलांना फोन ..

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला .
Tatkare-laad-chandrakant-da
Tatkare-laad-chandrakant-da

कर्जत (रायगड):  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला . या फोनचे कारणही तसेच होते . 

कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  सुरेश लाड  यांनी  तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत उपोषण सुरु केले होते . पण सुरेश लाड यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच सुनील तटकरेंनी रात्री उशिरा कर्जत गाठले .  सुरेश लाड यांचे उपोषण कोणत्याही परिस्थितीत तटकरेंना सोडवायचे होते . 

मंगळवारी सकाळी मोठा गाजावाजा करून  अकरा वाजता आमदार सुरेश लाड उपोषणाला बसले . पण दिवसभरात राज्य शासनाने  त्यांच्या उपोषणाची ना दाखल घेतली ना कोणी वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटायला आले . उपोषण सुरु होऊन ९ - १० तास झाल्यानंतर  दरम्यान लाड यांना रात्री अस्वस्थ वाटू लागले . रात्री साडे दहाच्या सुमारास उपोषणकर्ते आमदार  लाड यांची प्रकृती अचानक खालावली .  उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजीव धनेगावे यांनी तपासणी केली असता आमदार लाड यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना ग्लानी आल्याचे निष्पन्न झाले . ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना कळवली . 

सुनील तटकरे हे रोह्याला  होते . त्यांनी रात्रीच तातडीने  कर्जतला धाव घेतली . रात्री दीडच्या सुमारास ते उपोषणस्थळी पोहोचले . त्यांनी  सुरेश लाड यांना  उपोषण सोडण्याचा आग्रह धरला . पण आपल्या रस्त्यांबाबतच्या मागण्या मान्य  झाल्याशिवाय काही झाले तरी उपोषण सोडणार नाही ,अशी भूमिका लाड यांनी घेतली . या मनधरणीत अर्धा तास गेला . अखेर सुनिल  तटकरे यांनी रात्री दोन वाजता  चंद्रकांत पाटलांना फोन केला. पण चंद्रकांत पाटील यांनी तो फोन उचलला नाही . त्यामुळे पुन्हा पंचाईत झाली . 

मग सुनील तटकरेंनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अनेक अधिकाऱ्यांना रात्री फोन लावले . अखेर मुख्य अभियंता . श्री. भोसले यांच्याशी फोनवर संपर्क झाला . श्री. भोसले यांनी आमदार लाड यांच्या सर्व मागण्या ( तत्वतः ) मान्य  करून बुधवारी सकाळीच कार्यवाही कारण्याचे आश्वासन दिले . अखेर तोडगा निघला आणि आमदार लाड यांनी उपोषण सोडले . पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे  . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com