खासदार बनसोडेंबद्दल प्रणिती शिंदे चुकून बोलल्या : सुशीलकुमारांनी सावरली बाजू

खासदार बनसोडेंबद्दल प्रणिती शिंदे चुकून बोलल्या : सुशीलकुमारांनी सावरली बाजू

पुणे : खासदार शरद बनसोडे यांच्याबद्दल माजी आमदार प्रणिती जे काही बोलल्या ते चुकून बोलल्या. प्रणितींचा मला फोन आला होता. पप्पा माझी जीभ घसरली. पण मला त्यांच्याबद्दल असे बोलायचे नव्हते. बनसोडे यांच्याबद्दल प्रणितीला आणि मलादेखील आदर आहे. त्यांच्या विषयी आमच्या मनात कोणतीही वाईट भावना नाही. ते आमचे आहेत. प्रणिती चुकून बोलली आणि वर्तमानपत्रांनी तेच वाक्‍य घेतले, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज पुण्यात स्पष्ट केले. 

खासदार बनसोडे यांच्याबाबत माजी आमदार प्रणिती शिंदे यांनी बेवडा अशा शब्दांत अवहेलना केली होती. त्यावर चिडलेल्या बनसोडे यांनीही आरोप केले होते. गेले चार दिवस यासंदर्भाने आरोप प्रत्यारोप आणि गुपिते बाहेर काढण्याची भाषा दोन्ही बाजूंकडून करण्यात येत होती.

या आरोप-प्रत्यारोपांवर राजकीय वर्तुळात राज्यभर मोठी चर्चा सुरू होती. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांनी समजुतीची भूमिका घेत यावर भाष्य करून हा वाद संपविण्याचा प्रयत्न केला. एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर शिंदे यांनी याबाबत खुलासा केला.

" खासदार बनसोडे यांच्याबाबत माजी आमदार प्रणिती यांच्याकडून चुकून बोलले गेले. त्याबाबत त्यांनी माझ्याकडे खुलासा केला. आता हा वाद संपला असून खासदार बनसोडे यांच्याबद्दल आम्हा दोघांनाही आदर आहे,`` अशा शब्दांत त्यांनी या वादावर पडदा टाकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com