सोलापूर : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मिळालेला एबी फॉर्म सावंत यांनी काढून घेतला आहे.
बुधवारी दुपारी दोन वाजता कोठे आणि माजी आमदार दिलीप माने यांना पुन्हा 'मातोश्री'वर बोलाविले आहे. त्या वेळी निर्णयाची शक्यता आहे.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्याऐवजी माजी आमदार दिलीप माने यांच्यासाठी संपर्कप्रमुख तथा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत अडून बसले आहेत. कोठे यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न चालविले आहेत.
ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांनी कोठे यांना एबी फॉर्म दिला होता, पण तो सावंत यांनी काढून घेतल्याचे सांगण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी दुपारी दोन वाजता "मातोश्री'वर बोलाविले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.