विखेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात  शिवसेनेतूनच झाली : विनोद तावडेंचा टोला 

Tawde    Vs Vikhe
Tawde Vs Vikhe

मुंबई : "एकेकाळी विखेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात खऱ्या अर्थाने शिवसेनेतूनच झाली होती. आतासुद्धा शिवसेनेच्या मुखपत्राचा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर एवढा विश्वास कसा काय?" असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित केला. 

पुस्तकांतील चुकीच्या मजकुराबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी आज विनोद तावडे माध्यम प्रतिनिधिंशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्यासोबत सामना  या शिवसेनेच्या मुखपत्रावरही जोरदार टीका केली.

काहीच विषय नसला की अर्धवट माहिती घेऊन विखे पाटील आरडा -ओरड करतात व काही मुखपत्रे त्यांची री ओढून धरतात, असेही तावडे  यावेळी म्हणाले .

आज 'बाल नचिकेत' व 'भगवान वेदव्यास' या पुस्तकांमध्ये असलेल्या आक्षेपार्ह मजकुराबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी संबंधित मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. 

त्यावेळी सर्व स्पष्टीकरण देऊन झाल्यानंतर त्यांनी आपला रोख विरोधी पक्षनेत्यांवर वळविला. " राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्या युती सरकारचे शिवसेनेकडून मंत्री होते. त्यावेळी त्यांना मोठी संधी सेनेने दिली होती. अजूनही शिवसेनेच्या मुखपत्रावर  विखे पाटिल यांच्यावर आंधळा विश्वास असेल तर कुठेतरी पाणी मुरतंय, " असा टोला तावडेंनी लगावला. 

विखे पाटील हे घराणे काँग्रेसी असले तरीही बाळासाहेब व राधाकृष्ण हे पितापुत्र मधल्या काळात शिवसेनेत होते. हे दोघेही राज्यात आणि केंद्रात मंत्री होते. विखे पाटील शिवसेनेच्या काळातील मंत्रिपदाच्या  आपल्या आठवणी कुठेही काढत नाहीत.  परंतु तावडेंनी हा विषय आज ऐरणीवर आणून विखेंवरील आपला संताप अशा पद्धतीने व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com