महामेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांच भाषण सुरू झालं, अन् कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला !!

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचे गारूड कार्यकर्त्यांवर कायम असल्याचा प्रत्यय आज पुन्हा भाजपच्या महामेळाव्यात आला.
Gopinath-Munde
Gopinath-Munde

मुंबई  : भारतीय जनता पार्टीचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचे गारूड कार्यकर्त्यांवर कायम असल्याचा प्रत्यय आज पुन्हा भाजपच्या महामेळाव्यात आला. 

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील मैदानावर राज्यभरातून भाजपाचे सुमारे लाखभर कार्यकर्ते पोहचले आहेत. यावेळी स्क्रीनवर महामेळाव्यात गोपीनाथ मुंडे यांचे भाषण सुरू झालं.....अन् कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
 

आगामी 2019 च्या निवडणुकीवर डोळा ठेवत भारतीय जनता पक्षाने आपला महामेळावा मुंबईत आयोजित  केला . आजच्या महामेळाव्यात भाजपला दिग्गज नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडल्याने बीडचे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. मुंबईत ठिकठिकाणी झळकत असलेल्या पोस्टर्सवरून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो गायब असल्याने मुंडे समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी गोंधळ घातला होता. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पोटरवर लावण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

त्यानंतर सभेच्या स्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजप अमित शहा यांच स्वागत केल्यानंतर स्क्रीनवर आज पर्यंत पक्षासाठी झटलेल्या नेत्यांचे भाषणांची झलक दाखवण्यात येत होती. यामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, दिवंगत नेते प्रमोद महाजन, लालकृष्ण आडवाणी यांच्यासह दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची भाषण दाखवण्यात येते होते.

इतर नेत्यांच्या भाषणावेळी शांत असणारे कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांचे स्क्रीनवर भाषण सुरू होताच एकच जल्लोश करत उठून उभे राहिले.  "मरेन पण झुकणार नाही" या गोपीनाथ मुंडे यांच्या वाक्यावर अमर रहे !अमर रहे ! मुंडेसाहेब अमर रहे ! असा जयघोष कार्यकर्त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com