जेंव्हा माकडाने अचानक मारला चंद्रकांत पाटलांपुढे ठिय्या...

कार्यक्रम सुरू असताना अचानक एक माकड व्यासपीठावर आले. माकड बिनधास्तपणे व्यासपीठावर वावरू लागले.
Chandrakant-dada-&-Monkey
Chandrakant-dada-&-Monkey

सातारा : उंब्रज (ता. कराड) येथील एका कार्यक्रमांत व्यासपीठावर चक्क माकड येऊन बसले. थोडावेळ ते व्यासपीठावर वावरून महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील बसलेल्या खुर्ची पुढे बसले. थोडावेळ थांबून ते निघून गेले पण व्यासपीठावर उपस्थितात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

उंब्रज (ता. कराड) येथील ग्लोबल नॉलेज एक्सपोच्या उद्घाटन कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आले होते. व्यासपीठावर सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, मनोज घोरपडे, समृद्धी जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आदी उपस्थित होती.

कार्यक्रम सुरू असताना अचानक एक माकड व्यासपीठावर आले. माकड बिनधास्तपणे व्यासपीठावर वावरू लागले.  त्यानंतर मंत्री चंद्रकांत दादा पाटील बसलेल्या खुर्ची  समोरच त्याने ठिय्या मांडला. काहीवेळ ते तसेच बसून होते. त्यामुळे व्यासपीठावरील मान्यवरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  काही वेळानंतर ते माकड शांतपणे ते निघून गेले. त्यामुळे व्यासपीठावरील उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास घेतला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com