चालकाच्या मतदानासाठी सुप्रिया सुळेंनी बदलला रस्ता 

चालकाच्या मतदानासाठी सुप्रिया सुळेंनी बदलला रस्ता 

भवानीनगर : लोकशाहीतही एका-एका मताचे मूल्य अमूल्य आहे. त्याचा प्रत्यय आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनीही दाखवून दिला. आपल्या मोटारीच्या चालकाचे मतदान आठ किलोमीटर आतमध्ये आहे, हे लक्षात येताच त्यांनी नियोजित दौऱ्याचा रस्ता बदलून तावशी (ता. इंदापूर) गाव गाठले आणि तेथे चालकाचे मतदान होईपर्यंत त्या थांबून राहिल्या!

बारामतीतील बालनिरीक्षण गृह मतदान केंद्रात आज सकाळी मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी सुळे निघाल्या होत्या. बारामती, पिंपळी, लिमटेक, काटेवाडीमार्गे त्या इंदापूर तालुक्‍यातील पहिले गाव भवानीनगरमध्ये पोचल्या. तेथून त्या सणसर येथे पोचल्या. सणसरमधील मतदान केंद्र मोठे असून, येथे गर्दी केलेल्या मतदारांना नमस्कार करून बूथप्रमुखांशी त्यांनी चर्चा केली आणि त्या इंदापूर-बारामती रस्त्याने पुढे जाचकवस्ती, बेलवाडी, लासुर्णे अशा मार्गाने निघाल्या.

मात्र, अचानक त्यांनी चालक गणेश कांबळे याला, "मतदान केले का?' अशी विचारणा केली. त्यावर त्याने, मतदान तावशी येथे असून, आता घाई असल्याने मतदान करता येत नसल्याचे सांगितले. त्यावर सुळे यांनी त्यास गाडी वळवून कुरवली रस्त्याने तावशीकडे नेण्याची सूचना केली. तावशीत त्या पोचल्या. अनपेक्षितपणे त्यांनी तावशी केंद्रात भेटच दिल्याने राष्ट्रवादी व कॉंग्रेसचेही कार्यकर्ते अवाक्‌ झाले. त्यांनी मतदान केंद्राबाहेर एका दुकानाच्या बाहेर बसून कार्यकर्त्यांशी व मतदारांशी चर्चा केली. कांबळे याचे मतदान होईपर्यंत त्या तेथेच थांबून होत्या. मतदान झाल्यानंतरच त्यांची गाडी मधल्या रस्त्याने लासुर्णे गावात पोचली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com