चंद्रभागेची आरती यापूर्वी कधीही झाली नव्हती, शिवसेनेने नवा पॅटर्न निर्माण केला! 

या दौऱ्याचे विश्‍लेषणएक छानसा 'इव्हेंट', असे करता येईल.
चंद्रभागेची आरती यापूर्वी कधीही झाली नव्हती, शिवसेनेने नवा पॅटर्न निर्माण केला! 

सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्याचे पडसाद सोलापूर शहर-जिल्ह्यात उलट सुलट प्रमाणात उमटू लागले आहेत. प्रत्यक्षात या दौऱ्याचे विश्‍लेषण "फुकटची तीर्थयात्रा अन्‌ शिवसेनेची भारतीय जनता पक्षाकडे 'बार्गेनिंग पॉवर' वाढविण्याचा हा एक छानसा 'इव्हेंट', असे करता येईल. 

शिवसेनेच्या "थिंक टॅंक'ने दोन सुट्यांच्या मधला दिवस या "मेगा इव्हेंट"साठी निश्‍चित करून निम्मी बाजी मारली. म्हणजे 23 डिसेंबरचा रविवार आणि मंगळवारी ख्रिसमस असल्याने सोमवारचा दिवस या "मेगा इव्हेंट'साठी शिवसेनेने स्वीकरला. यामुळे या "इव्हेंट'साठी येणाऱ्यांना रजा, सुट्ट्यांची अडचण आली नाही. शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासून मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाने अर्थभार उचलल्याने प्रवासखर्चही निघाला. त्यामुळे अनेक लोकांना सोमवारी शिवसेनेच्या नावाने फुकटची पंढरपूर तीर्थयात्रा घडली. 

हा 'मेगा इव्हेंट' जनतेच्या प्रश्नासाठी असल्याचे भसविण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासून थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत प्रत्येकानेच केला. प्रत्यक्षात एक-दोन अपवाद वगळता ठाकरे यांनी भाषणात स्थानिक सोडा, प्रांतिक विषयांचाही आपल्या भाषणात उल्लेख केला नाही. ते फक्त मोदी, भाजप, राफेल यावरच बोलत राहिले. यामुळे लोकांचा हिरमोड झाला. तरी उपस्थितांनी ठाकरेंना मध्येच थांबवत कांद्यांच्या प्रश्नावर बोलण्याची विनंती केली. तेव्हा कुठे चार दोन वाक्‍य त्यांनी उपस्थितांच्या तोंडवार फेकली अन्‌ पुन्हा ते भाजपवर टीका करण्यात व्यग्र झाले. याचाच अर्थ त्यांना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपकडे शिवसेनेची "बार्गेनिंग पॉवर' वाढवायची आहे, हाच होतो...! 
 
दौऱ्यातील ठळक नोंदी 
- स्थानिक आमदारांसह मातब्बर नेत्यांना व्यासपीठावर अक्षरशः बसायलाही जागा दिली नाही, त्यांना उभे केले 
- संत-महंतांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उभारले खरे, पण स्वतः ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात साधा नामोल्लेखही केला नाही 
- स्थानिक प्रश्नांना ठाकरे यांच्या भाषणात ओझरताही उल्लेख नाही 
- सतत मंत्र्यांच्या गाड्यांच्या सायरनने पंढरपूरकरांचे डोके उठले 
- मुंबईतील नगरसेवक, शिवसेना शाखाप्रमुख यांनी त्यांच्या गाड्या मंदिर परिसरात सोडण्यासाठी हुज्जत घातली 
- चंद्रभागा नदीची आरती यापूर्वी कधीही झाली नाही, उत्तर भारतातील गंगेच्या आरतीप्रमाणे हा नवा पॅटर्न शिवसेने निर्माण केला 
- गर्दीने पंढरपूर फुलले, धंदा, व्यवसाय, व्यापार उदीम छान झाले 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com