Hasan Mushrif News : सलग पाच वेळा निवडून आलेले हसन मुश्रीफ ED च्या रडारवर कसे आले ? ; ही आहे भाजपची खेळी

Hasan Mushrif ED Raid : ईडीच्या कचाट्यात मुश्रीफ अडकले तर तर दोन लोकसभा, सहा विधानसभा, जिल्हा बॅंकेचे राजकीय समीकरण भाजप सहज बदलू शकतो
Hasan Mushrif, Kirit Somaya
Hasan Mushrif, Kirit Somayasarkarnama

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा चौकशी करुन त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख यांची ईडीनं चौकशी केली आहे.

ईडीच्या चौकशीनंतर अनिल देशमुख, नवाब मलिक यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. देशमुख हे जामीनावर सध्या बाहेर आहेत, तर मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत.

शरद पवारांना ईडीची नोटीस आली होती. मात्र, पवारांनी ईडीलाच आव्हान देत ‘मी चौकशीसाठी कार्यालयात येतो मात्र त्यानंतर काही घडले तर त्याला तुम्ही जबाबदार ‘अशी भुमिका घेतल्यावर तत्कालीन फडणवीस सरकारची फजिती झाली होती. प्रफुल्ल पटेल यांनाही केंद्रीय यंत्रणांनी नोटीस बजाविली होती.

आता राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मुश्रीफ हे ईडीच्या रडारवर कसे आले, तपास यंत्रणाची चौकशी लावून भाजप मुश्रीफांना अडचणीत आणत आहे, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु आहे. पण आता मुश्रीफांना अडकविण्यात भाजपने कंबर कसली असल्याचे दिसते.

भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर मुश्रीफ यांच्या कागल, पुण्यातील घरावर छापे पडले आहेत. मुश्रीफांची दुसऱ्यांदा ईडीची चौकशी का केली जात आहे, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. नवाब मलिकाप्रमाणे ते मुस्लिम समाजाचे नेते नाहीत, त्याचे कार्यक्षेत्र हे कोल्हापूर जिल्हा परिसरापुरतेच मर्यादीत असल्याचे सांगण्यात येते.

Hasan Mushrif, Kirit Somaya
Hasan Mushrif ED Raid : ED कडून विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना टारगेट केलं जातंय का ?

मलिकांप्रमाणे ते मुस्लिमांचे नेते नाहीत..

मलिकांप्रमाणे मुस्लिमांचे नेते म्हणून मुश्रीफांकडे पाहिजे जात नाही, कारण त्याचे स्थानिक राजकारण हे हिंदू-मुस्लिम समाजाच्या पलिकडचे आहे. त्यांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी होत आहे. यावरुन मुश्रीफ हे भाजपच्या रडार का आहे, हे जाणून घेऊया.. सलग पाच वेळा निवडून आलेल्या मुश्रीफांना अडचणीत आणण्याची भाजपची खेळी यशस्वी होईल का, असे प्रश्न सध्या विचारण्यात येत आहेत. यासाठी कोल्हापूर परिसराचे राजकारण समजून घेणे महत्वाचे आहे.

दोन खासदारांचे भविष्य ठरविण्यात मुश्रीफांची भूमिका महत्वाची

हिंदु-मुस्लिम दंगलीनंतर, मोदी लाटेतही मुश्रीफ हे कागल मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. हातकणंगले लोकसभेतील हातकणंगले, इचलकंरजी आणि शिरोळ मतदारसंघातही मुश्रीफांचा प्रभाव आहे. जिल्हातील दोन खासदारांचे भविष्य ठरविण्यात मुश्रीफांची भूमिका महत्वाची आहे. सध्या या दोन्ही मतदार संघात शिवसेनेचे खासदार आहेत. जे सध्या शिंदे गटासोबत गेले आहेत.

Hasan Mushrif, Kirit Somaya
NCP Hasan Mushrif ED Raid : मुश्रीफांचे खंदे समर्थकही ED च्या रडारवर

मुश्रीफांना लगाम घालणे गरजेचे

भाजप या मतदार संघातून स्वतःचे उमेदवार उभे करणार असेल तर त्यांना मुश्रीफांना लगाम घालणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावून त्यांना अडचणीत आणण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचे बोललं जाते. ईडीच्या कचाट्यात मुश्रीफ अडकले तर तर दोन लोकसभा, सहा विधानसभा, जिल्हा बॅंकेचे राजकीय समीकरण भाजप सहज बदलू शकतो, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

कारखाना व जिल्हा परिषदेवर पकड

कोल्हापूरचे राजकारण हे दूधसंस्था आणि साखर कारखाने यावर आधारीत आहे. यांच्या आर्थिक नाड्या सध्या मुश्रीफांकडे आहेत. मुश्रीफांचे विरोधक भाजपचे नेते समरतजीत घाटगे यांचा शाहू कारखाना हा संताजी घोरपडे कारखान्यामुळे अडचणीत सापडला आहे. घाटगेंना मुश्रीफांच्या विरोधात उभे राहायचे असेल तर घाटगेंना आर्थिक बळ मिळणे गरजेचे आहे. कारखाना व जिल्हा परिषदेवर पकड असलेले मुश्रीफांना रोखणं भाजपला गरजेचे वाटते. घाटगे हे फडणवीसांचे निकटवर्तीय आहे. घाटगेंचा निवडून आणणे फडणवीसांसाठी महत्वाचे आहे.

Hasan Mushrif, Kirit Somaya
Hasan Mushrif ED Raid : छापेमारीनंतर हसन मुश्रीफांचा एकच सवाल ; म्हणाले,'पुन्हा कशासाठी.."

यासाठी भाजपचा आटापीटा सुरु

कोल्हापूर जिल्हा बॅकेचे मुश्रीफ अध्यक्ष आहेत. बॅक, कारखाना, दुध संघ यातून मुश्रीफांना दूर करुन समरजीत घाडगे यांचा रस्ता मोकळा करणं हा भाजपचा डाव असल्याचे समजते. स्थानिक राजकारणात मुश्रीफ यांचा प्रभाव आहे. त्यामुळे ते भाजपच्या निशाण्यावर आहे. कोल्हापूर लोकसभेबरोबरच, राधानगरी, चंदगड या विधानसभेवर त्यांचा प्रभाव आहे. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी 'आमचं ठरलं' ही घोषणा देऊन २०१९च्या निवडणुकीत महाडिकांचा पराभव केला. याठिकाणी मुश्रीफ अडचणीत आले तर भाजपला कोल्हापूर लोकसभा सोपी जाणार आहे, यासाठी भाजपचा आटापीटा सुरु आहे.

शरद पवार यांचे निकटवर्तीय

काँग्रेमधून १९९९ मध्ये राष्ट्रवादीत आलेले मुश्रीफ हे शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात, अजित पवार, सुप्रिया सुळे,छगन भुजबळ अशा कुठल्याही गटात सहभागी न होता, शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई ही शरद पवारांवर कारवाई असे म्हटलं जाते, त्यामुळे विरोधक त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतात. चौकशीत ईडीच्या हाती काय लागणार, यावर मुश्रीफांचा पुढील राजकीय प्रवास ठरणार आहे, पण तपास यंत्रणांनी आरोप केला म्हणून त्यांचे राजकारण संपविण्याची खेळी विरोधकांना महागात पडेल की नाही, हे आगामी निवडणुकीत कळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com