Hasan Mushrif ED Raid :अंमलबजावणी संचालनालयाच्या (ed) पथकाने आज (बुधवारी) पहाटे 6 वाजताच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांच्या घरावर छापेमारीस सुरवात केली आहे. (Hasan Mushrif ED Raid News update)
त्यांच्या कागल व पुण्यातील घरावर ईडीने छापे टाकले आहेत. मुश्रीफ यांच्या घरावरील छाप्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. अनेक कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर जमले असून भाजपचा निषेध करीत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणा दिल्या.
या कारवाईबाबत हसन मुश्रीफ म्हणाले, "यापूर्वीही तपास यंत्रणांनी माझी चौकशी केली आहे. मी त्यांना सर्व माहिती दिली आहे. आता पुन्हा कशासाठी छापे टाकले, हे समजत नाही. मला नाऊमेद करण्यासाठी हे सारे सुरु असून गलिच्छ राजकारण सुरु आहे. माझे सहकारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी माहिती देत आहेत,"
"कार्यकर्त्यांनी शांत राहावे," असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे. अस्लम शेख व माझ्यासारख्या विशिष्ट समाजातील लोकांवर कारवाई केली जात आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आज ईडीने छापे टाकले आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.या प्रकरणीच ही छापेमारी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ईडी अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
अब्रुनुकसानीचा दावाही करणार
किरीट सोमय्या यांनीच या कारखान्यात हसन मुश्रीफांनी आपल्या जावयासोबत मिळून तब्बल 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. हसन मुश्रीफ यांनी हे आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. तसेच, असे आरोप केल्यामुळे किरीट सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावाही करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.