
नाशिक : जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने २ प्लाय आणि ३ प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर या बाबींचा समावेश जीवनाश्यक वस्तुमध्ये समावेश करण्यात आला आहे. या वस्तूंचा कृत्रिम तुडवडा निर्माण केल्यास किंवा काळाबाजार केल्यास विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, करोना व्हायरसच्या अनुषंगाने केंद्र शासनाने १३ मार्च २०२० रोजी च्या अधिसूचनेनुसार जीवनावश्यक वस्तु अधिनियम, १९५५ च्या परिशिष्टामध्ये कलम २ ए अंतर्गत अनुक्रमांक ८ मध्ये (८) ''मास्क, २ प्लाय आणि ३ प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर”या बाबींचा समावेश जीवनाश्यक वस्तु म्हणून केला आहे. सदर अधिसुचना दि. १३ मार्च ते दि.३० जून २०२० पर्यंत लागु करण्यात आली आहे. सदर अधिसुचना विभागाने दि.१४ मार्च रोजी पुर्नप्रकाशित केली असून कार्यवाहीसाठी विभागांतर्गत सबंधित यंत्रणांना तसेच गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आली आहे.
सदर अधिसुचनेनुसार केंद्र शासनाने २ प्लाय आणि ३ प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर यांचा साठा होऊ नये, सदर बाबी चढ्या किंमतीने विकू नये, ग्राहकांना सदर बाबी सहजासहजी उपलब्ध व्हाव्यात, काळा बाजार होऊ नये व जनतेमध्ये सदर बाबी सहज उपलब्ध होतील तसेच जनजागृती होईल याबाबत याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या अधिसूचनेनुसार २ प्लाय आणि ३ प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझर यांचा कृत्रिम तुटवडा तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर वैद्यमापन विभागाला कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.