मनसेचे माजी आमदार रमेश पाटील पुन्हा काॅंग्रेसमध्ये

कल्याणमधील समीकरणे बदलण्याची चिन्हे!
मनसेचे माजी आमदार रमेश पाटील पुन्हा काॅंग्रेसमध्ये

डोंबिवली : मनसेचे माजी आमदार रमेश रतन पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटील पुन्हा काॅंग्रेसच्या घरात जाणार आहेत.

पाटील हे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून २००९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. आधी काँग्रेस मग मनसे नंतर काही काळ पाटील भाजपमध्ये रमले होते. आज संध्याकाळी काॅंग्रेस यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत त्यांचा प्रवेश होणार आहे. 

रमेश पाटील हे मनसे नेते आणि राज ठाकरेंचे निकटवर्तीय मनसेचे नेते राजू पाटील यांचे मोठे भाऊ आहेत. ते विधानसभेसाठी इच्छुक आहेत की लोकसभेसाठी याची गणिते अद्याप ठरायची आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com