कल्याणमध्ये कॉंग्रेसचा बैलगाडी-टांगा मोर्चा 

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्‍किल झाले असून भाजप सरकार खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप करत सोमवारी कल्याणमध्ये कॉंग्रेसच्या वतीने बैलगाडी आणि टांगा मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कल्याणमध्ये कॉंग्रेसचा बैलगाडी-टांगा मोर्चा 

कल्याण - वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्‍किल झाले असून भाजप सरकार खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहे, असा आरोप करत सोमवारी कल्याणमध्ये कॉंग्रेसच्या वतीने बैलगाडी आणि टांगा मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

कल्याण पश्‍चिमेतील सहजानंद चौकातून निघालेला हा मोर्चा शिवाजी चौक, मोहम्मद अली चौक मार्गे तहसिलदार कार्यालयावर नेण्यात आला. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारची धोरण सामान्य नागरिकांच्या विरोधात असून बेरोजगारी, महागाई, जीएसटी, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आदी बाबींमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. यावेळी मोर्चात बैलगाड्या आणि टांगे यांचा समावेश करून त्यावर दुचाकी ठेवून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार हा मोर्चा काढण्यात आला होता. 

या मोर्चात कॉंग्रेसचे आमदार संजय दत्त , कॉंग्रेस कल्याण शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ब्रिज दत्त, विमल ठक्कर, जतीन प्रजापती, संतोष केणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. 

भाजप सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. भाजपने केवळ गाजर दाखविले असून कोणतेच आश्वासन पाळले नाही. सरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे. 
- सचिन पोटे, कल्याण शहर जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com