लाठीमार व शाखेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणपूर्व मध्ये शिवसेनेचा बंद

कोरेगाव -भीमा येथील घटनेच्या निषेर्धात बुधवार ता 3 जानेवारी रोजी कल्याण पूर्व पश्चिममध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळी कल्याण पश्चिम शिवाजी चौकातील शिवसेना शहर शाखा वरील हल्ला झाला आणि कल्याण पूर्व मधील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज याच्या निषेधार्थ आज गुरुवार (ता 4 जानेवारी) सकाळी 10 च्या सुमारासकल्याण, डोंबिवली , उल्हासनगर , अंबरनाथ , टिटवाळा , बदलापूर मधील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कल्याण पूर्व मधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लाठीमार व शाखेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणपूर्व मध्ये शिवसेनेचा बंद

कल्याण : कोरेगाव -भीमा येथील घटनेच्या निषेर्धात बुधवार ता 3 जानेवारी रोजी कल्याण पूर्व पश्चिममध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळी कल्याण पश्चिम शिवाजी चौकातील शिवसेना शहर शाखा वरील  हल्ला झाला आणि कल्याण पूर्व मधील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज याच्या निषेधार्थ आज गुरुवार (ता 4 जानेवारी) सकाळी 10 च्या सुमारास कल्याण, डोंबिवली , उल्हासनगर , अंबरनाथ , टिटवाळा , बदलापूर मधील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कल्याण पूर्व मधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोरेगाव - भीमा येथील घटनेच्या निषेर्धात बुधवार ता 3 जानेवारी रोजी दलित कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली मध्ये विविध ठिकाणी आंदोलन केली. यात कल्याण पश्चिम मधील शिवाजी चौकातील शिवसेना शहर शाखेवर हल्ला करत  कार्यालयाच्या बोर्डाची तोडफोड केल्याने शिवसैनिकामध्ये संतापचे वातावरण होते . याच कालावधीत कल्याण पूर्व मधील मराठा कोळशेवाडी शाखेजवळ शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक जमा होऊ लागले. दरम्यान शिवाजी कॉलनी, आनंदवाडी आणि जुना जनता सहकारी बँक परिसरात दोन गट आमने सामने येत घोषणाबाजी करत होते. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी 26 जणांना पोलिसांना ताब्यात घेतल्याने संतापाचे वातावरण होते.

कल्याण पूर्वमध्ये पडसाद
शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आज कल्याण पूर्व मध्ये चिंचपाडा, कोळशेवाडी, चक्कीनाका, पूनालिंक रोड आदी परिसरातील सकाळी दुकाने बंद करत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

धडक मोर्चा
शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार बालाजी किणीकर, शिवसेना कल्याण डोंबिवली महानगरप्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, नगरसेवक निलेश शिंदे, प्रकाश पेणकर, माजी नगरसेवक अरविंद्र मोरे, हर्षवर्धन पालांडे, रवी कपोते, विजया पोटे, दीपेश म्हात्रे, आदींसहित कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ टिटवाळा बदलापूर येथील शेकडो शिवसैनिक नगरसेवक, पदाधिकारी वर्गाने सहभाग घेतला. यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात घोषणाबाजी मुळे तणावाचे वातावरण होते.

शिवसेना विरुद्ध भाजपा - आरोप प्रत्यारोप
सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर हे डोंबिवली मधील भाजपाचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे हस्तक असून त्यांच्या इशाऱ्याने शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकावर हल्ला केल्याचा आरोप शिवसेना कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी यांनी केला असून आमच्या पध्दतीने समाचार घेणार असल्याचा इशारा दिल्याने भाजपा विरुद्ध शिवसेना मधील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

शिवसेना शाखेवरील हल्ले म्हणजे शिवसैनिक आणि भीमसैनिक मध्ये दुरावा , तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र आहे, त्यामुळे शांत होतो. परंतु पोलिसांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि चिंचपाडा आणि सिद्धार्थ नगर मध्ये जी दंगल झाली तेथे कारवाई न करता स्व-संरक्षणार्थ शिवसैनिक कोळशेवाडी शाखेवर असताना पोलिसांनी नाहक लाठीचार्ज केला, हल्ला केला, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर यांनी नाहक वातावरण बिघडविले, तेथे शिवसैनिकांवर हल्ला केला , यामुळे सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर यांचा आम्ही निषेध करत असून वाडेकर यांनी स्थानिक पोलिसांचे न ऐकता शिवसैनिकांना अटक केली दोन समाजात तेढ निर्माण केलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर यांचे निंलबन करत नाही तो पर्यंत शिवसेना आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिला.

कडकडीत बंद ...पोलीस बंदोबस्त
कल्याण पूर्व मधील सिद्धार्थ नगर , मराठा कोळशेवाडी , आनंदवाडी परिसरात बुधवारी तणाव असल्याने गुरुवार ता 4 जानेवारी रोजी सकाळ पासून कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला होता. तर दुकाने कडकडीत बंद होती. सायंकाळी 5 नंतर तुरळक दुकाने सुरू झाल्याने तेथील हळूहळू जनजीवन सुरळीत झाले .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com