कल्याण लोकसभा मतदारसंघात आघाडीला 'मनसे'च्या इंजिनामुळे गती मिळणार का

युतीच्या घोषणेमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्यानेकॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात शांतता पसरली आहे. आघाडीला मनसेमुळे मुळे गती मिळाल्यास 'आगरी कार्ड'च्या बळावर चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
Shrikant Shinde - Raju Patil
Shrikant Shinde - Raju Patil

कल्याण : शिवसेनेतून 2009 मध्ये आनंद परांजपे निवडून आले होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या वाटेवर गेले. 2014  मध्ये ते 'घड्याळ' चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणात उतरले; मात्र मतदारांना त्यांचे पक्षांतर रुचले नाही. ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परांजपे यांचा  पराभव केला. लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात पुत्र श्रीकांत यांच्यासाठी पालकमंत्री  शिंदे यांनी 'फिल्डिंग' लावत इतर पक्षांशीही जुळवून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे हितसंबंध आहेत. त्याचा फायदा घेत अलीकडे अनेक प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या. निवडणुकीत शिवसेनेसाठी ही जमेची बाजू ठरू शकते.

कळवा-मुंब्रा परिसरात मुस्लिम, तर कल्याण ग्रामीणमध्ये आगरी, कोळी आणि कुणबी समाजाचा प्रभाव आहे. उल्हासनगरमध्ये सिंधी मते निर्णायक ठरू शकतात. अंबरनाथमध्ये आगरी-कोळी समाजासह कोकणी, कुणबी मते अधिक आहेत. कल्याण पूर्व, दिवा आणि कल्याण ग्रामीण भागात उत्तर भारतीयांची संख्या अधिक आहे. डोंबिवली शहरात ब्राह्मण, कोकणी, आगरी समाजाचा प्रभाव आहे. कोकणी आणिब्राह्मण समाजाची मते खेचण्याचा प्रयत्न शिवसेनेला करावा लागणार आहे.

आनंद परांजपे पुन्हा रिंगणात उतरण्यास इच्छुक नसल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे श्रीकांत यांच्याविरोधात लढण्यासाठी सध्यातरी तुल्यबळ उमेदवार दिसत नाही. त्यामुळे युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. पालकमंत्री शिंदे यांचा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्कही पुत्राच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरेल.

मतदारांमधील नाराजीची कारणे...
- ग्रामीण भागातील रस्ते, पाण्याचा प्रश्‍न
- एमआयडीसी परिसराची झालेली वाताहत
- जमिनींच्या मुद्द्यांवरून स्थानिक भूमिपुत्रांचा असंतोष
- 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा रखडलेला प्रश्‍न
- आरोग्य सेवेचा बोजवारा
- रेल्वेच्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेचे रखडलेले काम

2014 मधील मतविभाजन...
- डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना) ः चार लाख 40 हजार 892
- आनंद परांजपे (राष्ट्रवादी) ः एक लाख 90 हजार 143
- प्रमोद (राजू) पाटील (मनसे) ः एक लाख 22 हजार 349
- नरेश ठाकूर (आप) ः 20 हजार 347
- दयानंद किरतकर (बसपा) ः 19 हजार 643

पक्षनिहाय इच्छुक उमेदवार...
- शिवसेना : डॉ. श्रीकांत शिंदे
- मनसे : राजू पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com