रायगड जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांच्यावर टीका करत राजीनामा

रायगड जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष माणिक जगताप यांच्यावर टीका करत राजीनामा

कर्जत : कर्जत तालुक्यात मुळातच काँग्रेस पक्षाची परिस्थिती समाधानकारक नसतांना काही नव्याने पक्षात प्रवेश केलेल्यांनी पक्षाची शिस्त मोडत चुकीच्या पद्धतीचा पायंडा पाडीत आहेत. असे असूनही जिल्हा अध्यक्ष माणिकराव जगताप हे फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने पक्षातील वाढत्या बंडाळीला त्रस्त होऊन अखेर कर्जत तालुकाध्यक्ष अरविंद पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे .

आपल्या राजीनामा पत्रात यांनी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कार्यशैलीवर सुद्धा आक्षेप घेतला आहे . कर्जत नगर परिषद निवडणुकीत कोणतीही मदत केली नाही. तसेच लोकसभेच्या निवडणूक काळात सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते कर्जतमध्ये दाखल होऊन कार्यकर्त्यांना बळ देत होते. मात्र तेव्हाही माणिकरावांनी एका फेरी व्यतिरिक्त पुन्हा पाऊल ठेवले नाही, असा आरोप त्यांनी केला.

या मतदारसंघात दुबळ्या झालेल्या काँग्रेसला कशी नवसंजीवनी मिळेल यासाठी अपेक्षित प्रयत्न केले नाही याउलट नेरळ मधील काही नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्यांना परस्पर प्रवेश देऊन त्यांची मोठ्या कमिटीवर निवडही केली आणि आता हीच लोक पक्षाच्या विरोधात कारवाया करीत आहेत. तालुकाध्यक्षांना विचारात न घेता परस्पर नवीन पदे बहाल केली जात आहेत. खेदाची बाब म्हणजे जगतापांना सांगून सुद्धा त्यांनीही दुर्लक्ष केल्याने अखेर मी या सर्व गोष्टीला कंटाळून कर्जत तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी यात म्हटले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com