कर्जत नगरपालिका : आमदार सुरेश लाड यांचा ऑल इन द  फॅमिली पॅटर्न 

" आमदारांची मुलगी असल्याने त्याचा फायदाच होत आहे. प्रचारात फिरताना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शरद लाड, राजेश लाड यांनी केलेल्या कामांमुळे माझ्याकडून अधिक कामाची अपेक्षा नागरिक करत आहेत. त्यासाठी निश्‍चित प्रयत्न करीन."प्रतीक्षा लाड, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, कर्जत नगरपालिका
ncp-Lad & Lad
ncp-Lad & Lad

कर्जत(जि.रायगड) : गेली दहा वर्ष कर्जत नगरपालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. आमदार सुरेश लाड यांनी  आपले पुतणे  शरद लाड यांना 2009 मध्ये तर 2014 मध्ये दुसरे पुतणे राजेश लाड यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली होती . त्यानंतर आता तिसऱ्यांदा 2019 च्या निवडणुकीत आमदार सुरेश लाड यांनी त्यांची कन्या   प्रतीक्षा लाड यांना  थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली  आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश लाड यांच्यावर कर्जत नगरपालिकेची जबाबदारी सोपवली आहे . यंदा नगराध्यक्षपदाची मोहीम फत्ते करण्यासाठी आमदार सुरेश लाड यांनी पुन्हा एकदा जोर लावला आहे . 

शिवसेनेतर्फे विद्यमान  नगरसेवक सुवर्णा जोशी  यांना  नगराध्यक्ष पदासाठी  उमेदवारी देण्यात आली आहे . त्यांनी लाड यांच्या घराणेशाहीवर टीकेचा रोख ठेवला आहे . 

 नगराध्यक्ष शरद लाड यांनी  2009 मध्ये   पहिल्या पाच वर्षांत एमएमआरडीएच्या निधीच्या माध्यमातून शहरातील रस्ते रुंद तसेच सिमेंट कॉंक्रीटचे बनवले होते. गटारांची बांधकामे केली होती. कर्जत नगरपालिकेची प्रशस्त इमारत उभी केली. तसेच कर्जत-दहिवली पादचारी पूल वजा बंधारा नव्याने बांधण्यात आला. त्यामुळे कर्जतकरांची पुराची समस्या कायमस्वरूपी दूर झाली. 

2014 मध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येऊन नगराध्यक्ष राजेश लाड हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले. तेव्हा त्यांच्याकडून कर्जतकरांना शहराच्या विकासाच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या; मात्र त्यांच्या कार्यकाळात बायोगॅस प्रकल्प वगळता निर्णायक कोणतीही मोठी विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षांचा भंग होऊन पदरी उपेक्षाच आली. 

आता 2019च्या नगराध्यक्षपदासाठी आमदार सुरेश लाड यांची मुलगी प्रतीक्षा लाड आपले नशीब आजमावत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com