पालघरची पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला 

पालघरची पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला 

लघर : कर्नाटकमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींचा दृश्‍य परिणाम पालघरच्या पोटनिवडणुकीत दिसू लागला आहे. अखेरच्या टप्प्यात पोहोचलेल्या या निवडणुकीत आता सर्वच राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले असून सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज नेते उमेदवाराच्या प्रचारासाठी पालघरमध्ये हजेरी लावत आहेत.
 
उमेदवारी दाखल करताना शिवसेना, भाजप आणि बविआ आघाडीने शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र गावितांसाठी तलासरी येथे सभा घेऊन प्रचारात आघाडी घेतली होती.

मात्र ससा-कासवाच्या या लढाईत कॉंग्रेसने जरी संथगतीने सुरुवात केली असली, तरी आता प्रचारयंत्रणा कार्यान्वित करताना दामू शिंगडा यांच्या प्रचारासाठी अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम, हुसेन दलवाई, डॉ. मुणगेकर, माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे, डॉ. राजू वाघमारे यांनी तारापूर, बोईसर, पालघर, वसई-विरार पट्ट्यात सभा, पत्रकार परिषदा घेऊून कॉंग्रेसच्या प्रचारात जोश भरला आहे. 

शिवसेना, भाजप व बहुजन विकास आघाडीनंतर कॉंग्रेस नेत्यांमधील हा उत्साह आणि जोश पाहता ही निवडणूक अटीतटीची होणार यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com