दिवंगत चिंतामण वनगा कुणाचे?

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत कै. चिंतामण वनगा यांच्या नावानेच भाजप मते मागत आहे. शिवसेनेने चिंतामण वनगा यांचा मूलगा श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. चिंतामण वनगा यांच्या छायाचित्रांचा भाजपकडून प्रचारात होत असलेल्या वापराबदद्ल कै. वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे कै. चिंतामण वनगा नेमके कुणाचे? भाजपचे, शिवसेनेचे, की दोन्ही पक्षाचे हा प्रश्न सध्या पालघरमध्ये चर्चिला जात आहे.
दिवंगत चिंतामण वनगा कुणाचे?

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत कै. चिंतामण वनगा यांच्या नावानेच भाजप मते मागत आहे. शिवसेनेने चिंतामण वनगा यांचा मूलगा श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. चिंतामण वनगा यांच्या छायाचित्रांचा भाजपकडून प्रचारात होत असलेल्या वापराबदद्ल कै. वनगा यांच्या पत्नी जयश्री वनगा यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे कै. चिंतामण वनगा नेमके कुणाचे? भाजपचे, शिवसेनेचे, की दोन्ही पक्षाचे हा प्रश्न सध्या पालघरमध्ये चर्चिला जात आहे.   

दिवंगत चिंतामण वनगा यांना भाजपाने नऊवेळा उमेदवारी दिली होती व त्यादरम्यान ते तीन वेळा खासदार व एका वेळी आमदार म्हणून निवडून आले होते. वनगा यांनी डहाणू, तलासरी भागामध्ये पक्षाची उभारणी करताना अनेक भाजपा नेत्यांची त्यांना साथ लाभल्याने भाजपा नेत्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला आहे. वनगा हे भाजपा कुटुंबातील सदस्य असल्याची भावना मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे भाजपा नेत्यांनी दिवंगत खासदार यांच्यावर आपला देखील अधिकार असल्याचा दावा करून त्यांच्या निधनामुळे जनतेमध्ये निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ घेण्याची प्रत्येक संधी घेण्याचा प्रयत्न करीत असताना वनगा कुटुंबीयांनी त्यांच्या छायाचित्रांचा वापर करण्यास हरकत घेतली आहे. यामुळे दिवंगत खासदार चिंतामण वनगा हे भाजपाचे की शिवसेनेचे किंवा या दोन्ही पक्षांनी राजकीय लाभापोटी दिखावा करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतचा कौल 28 मे रोजी मतदानातूनच स्पष्ट करणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com