पालघरच्या भूमीवर गावितांचे चांगभले 

"नंदुरबारचे पार्सल परत पाठवा', असे पालघर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांमार्फत राजेंद्र गावित यांच्याबाबत सांगितले जात असले, तरी गावित हे नंदुरबारचे नव्हे; तर ठाणे-पालघरचेच असल्याचे 2004 पासून दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांवरून स्पष्ट होत आहे.
पालघरच्या भूमीवर गावितांचे चांगभले 

पालघर : "नंदुरबारचे पार्सल परत पाठवा', असे पालघर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांमार्फत राजेंद्र गावित यांच्याबाबत सांगितले जात असले, तरी गावित हे नंदुरबारचे नव्हे; तर ठाणे-पालघरचेच असल्याचे 2004 पासून दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांवरून स्पष्ट होत आहे. या काळात राजकीय व सामाजिक क्षेत्रासोबतच त्यांनी आर्थिक क्षेत्रातही प्रगती केली आहे. म्हणूनच 2004 मध्ये सव्वा कोटीचे मालक असलेले राजेंद्र गावित सध्या 9.5 कोटींचे धनी असून पालघरच्या पोटनिवडणुकीतील सर्वांत श्रीमंत उमेदवार आहेत.
 
2004 मध्ये कोणत्याही प्रकारची शेतजमीन नसलेल्या राजेंद्र गावित यांच्याकडे नंदुरबार (7 लाख), मिरा रोडमध्ये दोन (25 लाख व 9 लाख) इतर (2.75 लाख) पाच वाहने, अशी 43.75 लक्ष रुपयांची स्थावर मत्ता व कुटुंबीयांच्या नावे 39.68 लक्ष रुपयांची जंगम मालमत्ता व 22.79 लक्ष रुपयांचे दायित्व अशी सुमारे सव्वा कोटी रुपयांची मालमत्ता होती. 

2009 मध्ये पालघर विधानसभा मतदारसंघातून विजयी होण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांची जंगम मालमत्ता 31.85 लक्ष; तर स्थावर 1.59 कोटी अशी मिळून 1.90 कोटी रुपयांची होती. पण 2009 ते 2014 या सत्तेमधील व नंतरच्या राज्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांची राजकीय व व्यावसायिकदृष्ट्या भरभराट झाल्याचे एकूण आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

गावित यांची मालमत्ता 
पालघर लोकसभेची पोटनिवडणूक लढविताना गावित कुटुंबीयांकडे दीड कोटी रुपयांची जंगम व आठ कोटी रुपयांची स्थावर, अशी सुमारे 9.56 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता असून 2.73 कोटी रुपयांचे दायित्व आहे. यामध्ये सन 2007 मध्ये रोकास्वडे (नंदूरबार) येथे 3.92 एकर व सन 2011 मध्ये चेने (भाईंदर) येथे विकत घेतलेली 30 गुंठे शेतजमीन, पालघरमध्ये मे 2012 मध्ये खरेदी केलेले 38 हजार 369 चौरस फूट, एप्रिल 2007 मध्ये धुळे येथे खरेदी केलेली तीन हजार 228 चौ. फूट, कावेसर (ठाणे) येथे जून 2010 मध्ये खरेदी केलेल्या 27 हजार 910 चौ. फूट बिगरशेती जागेचा समावेश आहे. त्याचबरोबर गावित यांच्याकडे मिरा रोड पूनमसागर (सन 2003-564 चौ. फूट), मिरा रोड शांतीनगर (सन 1999-480 चौ. फूट) नंदूरबार (सन 1998-1200 चौ. फूट) या रहिवासी मालमत्तेसह ऑक्‍टोबर 2012 मध्ये अंबोली (अंधेरी) येथील 480 चौ. फूट व जानेवारी 2016 मध्ये वर्सोवा येथील 700 चौ. फूट जागेचा समावेश आहे. शिवाय त्यांच्या मालकीची मिरा रोड येथे 430 चौ. फुटांची वाणिज्य वापराची जागा आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com